ज्येष्ठ नागरिक विकास मंच बांदा पंचक्रोशीच्या वतीने सीताराम गावडे (शाखाधिकारी सिंधुदुर्ग जिल्हा मध्य.सह.बँक बांदा शाखा) यांचा सन्मान
ज्येष्ठ नागरिक विकास मंच बांदा पंचक्रोशीच्या वतीने सीताराम गावडे (शाखाधिकारी सिंधुदुर्ग जिल्हा मध्य.सह.बँक बांदा शाखा) यांचा सन्मान व शुभेच्छा.
बांदा:प्रतिनिधी:शैलेश गवस
रोटरी क्लब ऑफ बांदाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक विकास मंच बांदा पंचक्रोशीच्या वतीने माननीय श्री सीताराम गावडे (शाखाधिकारी सिंधुदुर्ग जिल्हा मध्य.सह.बँक, बांदा शाखा) यांना सन्मानित करण्यात आले व शुभेच्छा देण्यात आल्या.
शुभेच्छा देताना मंचचे अध्यक्ष अन्वर खान,उपाध्यक्ष हनुमंत सावंत भोसले.,खजिनदार जगन्नाथ सातोसकर.,ज्येष्ठ सदस्य एम् डि मोरबाळे,शंकर नार्वेकर,महादेव वसकर, सुकाजी गोपाळ गावडे,अनिल नाईक, अंकुश माजगावकर , तुळशीदास धामापूरकर, नरेंद्र सारंग, सुभाष नाईक, यशवंत सावंत आणि सचिव गुरुनाथ नार्वेकर उपस्थित होते.
यावेळी शंकर नार्वेकर सर यांनी संकलित केलेले पुस्तक श्री सीताराम गावडे यांना देण्यात आले.

