आणखीआपत्कालीनआरोग्यक्राइम

सह्याद्री पट्ट्यातील एका गावात नात्याला काळीमा फासणारी घटना 

 

 

महिलेवर अतीप्रसंग करण्याचा प्रयत्न करून जिवे मारण्याचा प्रयत्न

 

सावंतवाडी, दि १२: सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यातील एका गावच्या वस्तीत सख्या दीर भावजय नात्याला काळीमा फासणारी घटना घडली,त्या महिले सोबत तीची सात वर्षाची मुलगी असताना तीच्या देखत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला , संबंधितांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित अत्याचारग्रस्त महिला आणि संशयित तरुण एकमेकांच्या नात्यातील आहेत. संबंधित महिलेला शासनाकडुन नुकतीच जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरायचा होता. यावेळी त्या तरुणाने आपण दुचाकीने जावूया, असे सांगून त्या दोघांना तो घेवून गेला. मात्र रात्री उशिरा परतत असताना रस्त्यावर कोणीच नसल्याची संधी साधून त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या दोघात झालेल्या झटापटीत त्या तरुणाने तिच्या सोबत असलेल्या अल्पवयीन मुलीला ढकलून दिले. यावेळी अचानक घडलेल्या प्रकारामुळे भेदरलेल्या त्या महिलेने आरडाओरड करण्यास सुरुवात केली यावेळी आपण अडचणीत येवू या भितीने त्याने तेथून पलायन केले..

याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण घटनास्थळी दाखल झाले व वस्तुस्थितीची पाहणी करून,खोलवर तपास केला त्यावेळी हा अतिप्रसंग करण्याचा प्रकार पुढे आला,आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे,अधिक तपास सुरू आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!