कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेशैक्षणिक

अंगणवाडी सेविकांसाठी खुल्या निबंध स्पर्धा

*🛑अंगणवाडी सेविकांसाठी खुल्या निबंध स्पर्धा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ले, दि-१२:-* वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस आणि कै. गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच, दाभोली-वेंगुर्ले यांच्या सहकार्याने सर्व आजी-माजी अंगणवाडी ताई आणि मदतनीसांसाठी खुल्या निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. निबंध लेखनासाठी ‘बालसंस्कार : काळाची गरज’ हा विषय असून किमान ७०० तर कमाल १००० शब्दांमध्ये महिलांनी आपले मत सबंधित विषयावर मराठी भाषेत व्यक्त करायचे आहे. सोबत मुख्याध्यापक किंवा सरपंचांचे अंगणवाडी ताई किंवा अंगणवाडी मदतनीस असल्याबाबतचे शिफारसपत्र जोडणे अनिवार्य आहे. स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ प्रथम, द्वितीय क्रमांकासाठी अनुक्रमे रोख १०००, ७००, ५००, २५०, २५० आणि प्रत्येकी चित्रफ्रेम, प्रमाणपत्र, मेडल आणि सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. सदर निबंध कागदाच्या एका बाजूला स्वहस्ताक्षरात लिहून पोस्टाने किंवा हाती वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस, द्वारा प्रा. डॉ. सचिन परुळकर, तुळस-वेंगुर्ले या पत्त्यावर १५ ऑगस्टपर्यंत पाठवायचे आहेत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी प्रा. परुळकर – ९४२१२३८०५३ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आंतरराष्ट्रीय पंच व क्रीडा संस्कृती प्रचारक अशोक दाभोलकर-मेस्त्री आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!