आपत्कालीनकोकणवेंगुर्लेसिंधुदुर्ग

पाट येथे दोन दुचाकी स्वारात समोरा समोर धडक

 

खड्डे चुकवण्याच्या नादात झाला अपघात

पाट- पिंगुळी रस्त्यावरील खड्डे ठरतायेत वाहनधारकांना त्रासदायक

प्रतिनिधी – समीर चव्हाण

वेंगुर्ले – आज सायंकाळी सात च्या सुमारास पाट पेंडुरकर स्टॉप च्या अलीकडे दोन दुचाकी स्वरांची (महेंद्रा सेंचुरो व हिरो स्पेलंडर ) समोरा समोर धडक होवून अपघात झाला. रस्त्यावरील खड्डे चुकविनाच्या नादात हा अपघात झाला या अपघातात दुचाकी स्वार जखमी झालेत व त्यांचा दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.

पाट- पींगुळी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागते. प्रशासनाने या रस्त्याकडे दुर्लक्ष केलाच आहे पण राजकिय नेते सुध्दा या रस्त्याचा विषयावर मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यामुळे या रस्त्याने दररोजचा प्रवास करणारे वाहनधारक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. एकंदरीत या रस्त्याबाबत प्रशासन व राजकिय नेते ‘तेरी भी चूप ओर मेरी भी चूप’ ही भूमिका घेताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!