जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत रहाटेश्वर ग्रामपंचायत बिनविरोध झाली जाहिर

 

*देवगड तालुक्यातील रहाटेश्वर ग्रामपंचायत बिनविरोध शिवसेनेकडे…भाजपला धक्का*

आमदार नितेश राणे यांनी रहाटेश्वर ग्रामपंचायत सर्व सदस्य बिनविरोध जाहीर केले होते. त्याचें खोटे बोलण्याचे पितळ आज जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज हाणून पाडले व ही बिनविरोध ग्रामपंचायत शिवसेने सोबत राहिली
रहाटेश्वर ग्रामपंचायत मधील ७ पैकी ४ ग्रामपंचायत सदस्य शिवसेनेचे बिनविरोध आले. त्यातील ग्रामपंचायत सदस्य श्रीनिवास गुरव हे अपक्ष निवडुन आले होते त्यांनी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे रहाटेश्वर ग्रामपंचायत शिवसेनेकडे बिनविरोध झाली. तसेच रहाटेश्वर मधील भाजपा राणे समर्थक कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश शिवसेना पक्षात केला. त्यावेळी ग्रा.पं. सदस्य जयप्रकाश गुरव, श्रीनिवास गुरव, कल्पना कदम, प्रतीक्षा धुरी, शाखाप्रमुख दीपक कदम, सखाराम कदम व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रवेश केलेल्या पैकी प्रकाश भावे, रोहिदास कदम, महेश कदम, विलास कदम, अशोक पांचाळ तसेच शेकडो कार्यकर्ते होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!