राजन तेलींची केसरकरांना सणसणीत चपराक -रुपेश राऊळ
*🛑राजन तेलींची केसरकरांना सणसणीत चपराक -रुपेश राऊळ*
*🛑आता तरी दिपक केसरकर यांनी नैतिकता स्विकारुन राजिनामा द्यावा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०८:-* मंत्री दिपक केसरकर यांना त्यांच्याच मित्र पक्षाचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सणसणीत चपराक दिली आहे. आतातरी थापा मारणाऱ्या केसरकर यांनी थोडीशी जरी नैतिकता असेल तर मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे असे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी म्हटले आहे. केसरकर यांच्या थापेबाजीवर जनतेत नाराजी आहे. आता तर केसरकर यांच्या मित्र पक्ष भाजपचे राजन तेली यांनीच मंत्री पदावरून पायउतार व्हावे असे म्हटले आहे त्यामुळे केसरकर यांनी नैतिकता दाखवून राजीनामा दिला पाहिजे असे राऊळ यांनी सांगितले.
दरवर्षी पावसाळ्यामध्ये पुराचा फटका सावंतवाडी तालुक्याला बसतो यामध्ये बांदा परिसर व बाजारपेठ व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणात बसतो. मात्र प्रशासन, शासन यंत्रणा याबाबत कायमस्वरूपी मार्ग काढण्यास कुचकामी ठरली आहे. यामुळे दुकानदारांचे मोठे नुकसान होते. तसेच सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यात नुकसान होते. तेव्हा केसरकर यांनी हे करू,ते करू असे म्हटले. मात्र केसरकर यांनी काहीच केले नाही. ते मुंबई मध्ये निवासी झाले आहेत. त्यामुळे लोकांच्या अडीअडचणीला आमदार धाऊन जात नाहीत अशा तक्रारी आहेत असे त्यांनी सांगितले.
आतापर्यंत अनेक आश्वासने, घोषणा केसरकर यांनी केल्या. पण बेरोजगारांना वाऱ्यावर सोडले. शिक्षणमंत्री असतानाही डीएड बीएड तरुणांना वाऱ्यावर सोडून दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दीडशेहून शाळा नादुरुस्त आहेत. विद्यार्थी पाणी गळत असलेल्या वर्गामध्ये बसत आहेत, शिक्षण मंत्री हे सिंधुदुर्गातील आहेत. फक्त घोषणा, खोट्या आशेवर लोकांना भूलभुलैया करत आहेत असे राऊळ यांनी सांगितले. काल रविवारी ढगफुटी सारखा पाऊस झाला. तेव्हा आमदार वैभव नाईक रस्त्यावर उतरून लोकांच्या मदतीला धावून गेले तर केसरकर सावंतवाडी मध्ये असूनही बांदा पूरस्थिती, होडावडा, तळवडे, सावंतवाडी,दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील नागरिकांच्या साधी विचारपूस करायला गेले नाहीत त्यामुळे केसरकर यांचे खायचे आणि दाखवायचे दात जनतेला कळत आहेत असे राऊळ यांनी सांगितले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_