*दिपक केसरकर सोडून कोणालाही आमदार म्हणून निवडून द्या -राजन तेली*
*दिपक केसरकर सोडून कोणालाही आमदार म्हणून निवडून द्या -राजन तेली*
*केसरकर यांनी मतदारसंघ विकासा पासून वंचीत ठेवला*
*आता भाकरी परतवयाची वेळ आली आहे,जनतेने अंतर्मुख होऊन विचार करावा*
*केसरकरांच्या कालखंडात मतदार संघ विकासा पासून वंचित राहिला*
सावंतवाडी –
गेल्या पंधरा वर्षात शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी एक वेळा राज्यमंत्री तर सध्या कॅबिनेट मंत्रीपद भूषवत आहेत, या कालखंडात त्यांनी आपल्या मतदारसंघात बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी काय केले ते जाहीर करावे,नेहमी निवडणुकी आली की आश्वासन द्यायची व बेरोजगार युवकांची फसवणूक करायची हा एक कलमु कार्यक्रम दीपक केसरकर यांनी केला आहे,त्यामुळे हा मतदार संघ आजपर्यंत विकासापासून वंचित राहिला आहे, म्हणून या मतदारसंघातील जनतेने दीपक केसरकर सोडून कोणालाही मतदान करावे मात्र केसरकर यांना पुन्हा आमदार म्हणून निवडून देऊ नये अशी कळकळीचे आवाहन माजी आमदार व भाजपचे नेते राजन तेली यांनी जनतेला केले आहे.
केसरकर यांनी आपल्या आमदारकीच्या कालखंडात सोयीचे राजकारण केले,प्रत्येक वेळी आपल्या सोयीसाठी वेगवेगळ्या नेत्यांवर आरोप करून आपला इच्छीत हेतू साध्य करून घेतला मात्र मतदारांसाठी त्यांनी काही केले नाही, या भागात एकही कारखाना उद्योग किंवा आरोग्य व्यवस्था ते आणू शकले नाहीत, त्यामुळे हा जिल्हा विकासापासून वंचित राहिला या मतदारसंघाचा विकास करायचा असेल ओ बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे अशी येथील जनतेची खरोखर इच्छा असेल तर दीपक केसरकर सोडून त्यांनी कोणालाही मतदान करावे मात्र पुन्हा एकदा दीपक के सरकारला जनतेने आमदार म्हणून निवडून दिल्यास हा मतदारसंघ कायमचा विकासापासून वंचित राहील व जनतेला फक्त स्वप्नातला विकासच पहावा लागेल असा गंभीर आरोप करत आता भाकरी परतायची वेळ आली आहे असे स्पष्ट केले.
मी स्वतःला आमदार करा किंवा जनतेने मला मतदान करावे असे आवाहन कधीच केले नाही मात्र सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनतेने डोळे बंद करून केसरकर यांच्यावर प्रेम केले व केसरकर यांना निवडून देऊन मंत्री पदापर्यंत पोहोचवले त्या केसरकर यांनी या जनतेसाठी काय दिले व काय केले याचे आत्मपरीक्षण जनतेने व दिपक केसरकर यांनी करावे.
. सेट टॉप बॉक्स कारखाना चष्मा चा कारखाना फिशरमन व्हिलेज,काथ्या उद्योग आता जर्मनी येथे चार लाख मुलांना पाठवणार हा सगळा भुलभुलैय्या आहे, सिंधुदुर्ग जिल्हा विकसनशील जिल्हा म्हणून प्रसिद्ध असताना पर्यटनाच्या माध्यमातून अनेक रोजगार या ठिकाणी केसरकर उपलब्ध करू शकले असते मात्र त्यांनी येथील जनतेला आश्वासना पलिकडे काहीच दिले नाही.रस्ते विज, पाणी या सर्व निरंतर चालणाऱ्या प्रक्रिया आहे ते कोणी आले तरी होणारच मात्र या पलीकडे जाऊन केसरकर यांनी या मतदारसंघासाठी काय केले याचे स्वतःच आत्मपरीक्षण करावे या मतदारसंघातील अनेक घरे का बंद आहेत, त्यातील युवक कुठे गेले आहेत अनेक युवकांचे म्हातारे आई-वडील आपले व्यथित होऊन जिवन का जगत आहेत याचा खरा विचार करण्याची वेळ आली आहे, त्यामुळे जनतेने अंतर्मुख होऊन विचार करावा व केसरकर सोडून कोणीही आमदार निवडून द्यावा असे आपण माजी आमदार राजन तेली यांनी या विधानसभा मतदारसंघातील जनतेला केले आहे. केसरकर यांच्या या आव्हनामुळे राजकीय व्दंव्द भविष्यात पाहायला मिळणार एवढे मात्र निश्चित झाले आहे.

