राजन तेलींची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी करणार
*🛑राजन तेलींची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी करणार !*
*🛑शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०८:-* मी महायुतीचा धर्म पाळणार आहे. या महायुतीमध्ये दुही निर्माण करण्याचे काम दुसऱ्या पक्षाच्या संपर्कात असणारे राजन तेली करीत आहेत. त्यांचे महाराष्ट्रातील अस्तित्व काय आहे? आमदार व्हायचं म्हणून पातळी सोडून टीका ते करीत आहेत. त्यांची भाजप पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी मी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले. सावंतवाडीत पत्रकारांसोबत बोलताना केसरकर म्हणाले, माझ्या तोंडून खूप काही निघू शकते आणि मी जर बोललो तर यांना कठीण जाईल. यापुढे राजन तेलींविषयी मला काहीही विचारु नका. स्वतःला आमदारकी मिळावी म्हणून ते कुठल्याही स्तराला जाऊन बदनामी करीत असतील तर मी खपवून
घेणार नाही.
*खासदार राऊतांना काय कळतं?*
यावेळी केसरकरांनी माजी खासदार विनायक राऊत यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, माजी खासदार विनायक राऊत यांना काय कळतं. जिल्ह्यातील आणि विशेषतः सावंतवाडी मतदारसंघातील ज्या शाळा दुरुस्तीसाठी आहेत त्या शाळांची दुरुस्ती आम्ही केली आहे. आमचे कार्यकर्ते शाळांची दुरुस्ती करून घेत आहेत मी तशा सूचना केल्या आहेत. आम्हाला शिक्षण व्यवस्थेबद्दल काळजी आहे, असेही ते म्हणाले.
*बबन साळगावकर यांना मी
नगराध्यक्ष बनविले*
केसरकर म्हणाले, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना मी नगराध्यक्ष बनविले, आणि माझं कर्तव्य संपलं आहे. त्यांना देवाने जीभ दिली आहे, त्यांनी हवं तेवढं काही ते बोलावे, मी त्यांना काहीही उत्तर देणार नाही, असेही ते म्हणाले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

