कोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

जिल्हा नियोजन समितीची १६ रोजी सभा

*🛑जिल्हा नियोजन समितीची १६ रोजी सभा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-०६:-* जिल्हा नियोजन समितीची सभा
मंगळवार १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या नव्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीची मागील सभा २२ डिसेंबर २०२३ रोजी झाली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सहा महिन्यांनी सभा होत आहे. या सभेत मागील २०२३-२४ या वर्षाच्या २०० कोटीच्या वर्षिक आराखड्याच्या खर्चाचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच २०२४-२५ या चालू वर्षाच्या २५० कोटीच्या जिल्हा वार्षिक आराखड्याच्या कामांचे नियोजनही केले जाणार आहे. दरम्यान विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सप्टेंबर २०२४ मध्ये होऊ घातलेल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकांसाठी अवघे दोन महिने राहिलेले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी समितीची सभा होत असल्याने ही सभा महत्वपूर्ण ठरणार आहे. तसेच नियोजन समितीवर काही निमंत्रित सदस्यांना घेतले असल्याने या सदस्यांसाठीही ही सभा महत्वाची ठरणार आहे. शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांचा पराभव झाल्याने नियोजन समितीवर आता शिवसेना आमदार वैभव नाईक वगळता सर्वच सदस्य सत्ताधारी आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाच्या माध्यमातून एकट्या आमदार नाईक यांना सभेत किल्ला लढवावा लागणार आहे. तसेच नारायण राणे लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर त्यांची ही पहिलीच सभा आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!