युवासेनेच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे फॉर्मचे घरोघरी वाटप
*🛑युवासेनेच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे फॉर्मचे घरोघरी वाटप*
*🛑कणकवलीत महिला सहाय्यता शाखा सुरू करणार*
*🛑युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची माहिती*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*
*🎴कणकवली, दि-०६:-* राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सूरू केली आहे. सर्वसामान्य महिलांना होणारा त्रास लक्षात घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीने या लाडकी बहीण योजनेला लागणारे फॉर्म घरोघरी वाटण्याचा उपक्रम युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कलमठ येथून सुरू करण्यात आला.
कणकवली ,देवगड ,वैभववाडी, मतदारसंघात हे फॉर्म शिवसैनिकांतर्फे आणि युवा सेनेच्या वतीने आम्ही घरोघरी एक फॉर्म देण्याचा प्रयत्न आमचा असेल. 3000 च्या संख्येने हे फॉर्म आम्ही छापलेले आहेत. हा फॉर्म घेण्यासाठी तहसीलदार मध्ये जावं लागत, तहसीलदार ऑफिस मधून घेतलेला फॉर्म घरी भरावा लागतो. आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकांकडे हा फॉर्म सबमिट करायची त्यांची जबाबदारी अंगणवाडी सेविकांची आहे. तरच या योजनेचा खरा लाभ सर्व सामान्य महिलांनी राहील.
लाडकी बहीण योजना मध्यप्रदेश मध्ये आधीच सुरू झाली होती. आता महाराष्ट्र राज्य सरकारला जाग आली. उशिरा का होईना जाग आली. येणारे सरकार महाविकास आघाडीचे असणार आहे. त्यावेळी आम्ही मागणी करू या लाडकी बहीण योजनेत मिळणारे पैसे 1500 आहेत. लाडकी बहीण योजनेतून मिळणारे पैसे दुप्पट करा अशी मागणी आमच्या पक्षाच्या वतीने करणार असल्याचे श्री.नाईक यांनी सांगितले. हा सर्वसामान्य जनतेचा पैसा हा या लाडक्या बहिणी योजनेच्या स्वरूपाने सर्वसामान्य लोकांपर्यंत जाणार आहे. त्यामुळे गरजवंत महिलांना हा पैसा त्यांच्या खात्यात जमा झाला पाहिजे. अशी आमची योजना श्री.सुशांत नाईक यांनी सांगितले. येत्या सोमवार पासून कणकवली शहरात तहसीलदार कार्यालयासमोर महिला सहाय्यता शाखा सुरू करणार आहोत. त्याचा लाभ महिलांनी घ्यावा. ऑनलाइन फॉर्म आणि ऑफलाइन फॉर्म याच ठिकाणी मिळणार आहेत. युवा सेना प्रमुख सुशांत नाईक यांनी सांगितले.
यावेळी तालुका प्रमुख उत्तम लोके, संदिप गांवकर ,वैदेही गुडेकर, धनश्री मेस्त्री, अर्चना कोरगावकर, अनुप वारंग, सचिन खोचरे, धीरज मेस्त्री, निसार शेख, विलास गुडेकर, नंदकिशोर कोरगावकर आधी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

