कृषि माहिती केंद्राचे मळेवाड येथे उद्घाटन
*🛑कृषि माहिती केंद्राचे मळेवाड येथे उद्घाटन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- ०५:-* उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे मधील ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम -२०२४-२५ अंतर्गत आयोजन. उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे मधील ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम -२०२४-२५अंतर्गत कृषिदूतांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात विविध प्रकारच्या माहितीचे तक्ते व अनेक शेती संबंधित वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले. हा कार्यक्रम ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख अध्यक्ष म्हणून मुळदे महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. रणजित देव्हारे सर, तसेच मळेवाड कोंडूरे गावचे सरपंच सौ . मिलन पार्सेकर व उपसरपंच श्री. हेमंत मराठे ह्यांच्या हस्ते कृषि माहिती केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी सहाय्यक कृषि अधिकारी डॉ. गवंडे महिला बचत गट सदस्य मीना नाईक, मळेवाड कोंडूरे ग्रा.पं.सदस्य अर्जुन मुळीक, सौ.सानिका शेवडे,श्री मधुकर जाधव, सौ. कविता शेगडे , पोलिस पाटील दिगंबर मसुरकर उपस्थिती होते. ह्या प्रदर्शनामध्ये अनेक प्रकारचे जैविक खते , किटक नाशक सापळे,विविध प्रकारच्या केल्या जाणाऱ्या कलम पद्धती, लाखी बाग प्रकल्प, कोकेडामा , शोभिवंत कुंड्या अश्या आधुनिक सजावट पद्धती मधील झाडे प्रात्यक्षिक स्वरूपात विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना समजावून सांगितले. तसेच महाराष्ट्र शासन कृषि विभाग योजनांचे व शेती संबंधित तक्ते लावण्यात आले होते. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांची व ग्रामस्थांची चांगली उपस्थिती लाभली. मळेवाड कोंडूरे उपसरपंच श्री . हेमंत मराठे ह्यांनी कृषिदूतांना व शेतकऱ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन केले तसेच उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे चे सहयोगी प्राध्यापक डॉ. रणजित देव्हारे यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या. या कृषि माहिती केंद्राद्वारे हे कृषिदुत पुढील ६ महिने शेतकऱ्यांच्या पारंपारिक पद्धती व डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोलीने शिफारस केलेले आधुनिक तंत्रज्ञान यांचा मेळ घालून बळीराजाच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. सदर गटा मध्ये अंकित गावणकर, ध्रुव मालडीकर, संचित तांबट, आल्पेश वाळके, अभिषेक अनाप , शशांक साळुंखे, प्रदीप चौधरी या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

