दत्ताराम गावडे यांचे जि. प. समोर उपोषण
*🛑दत्ताराम गावडे यांचे जि. प. समोर उपोषण*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओरोस, दि-०४ :-* सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथील धर्माजी गावडे यांनी नैसर्गिक पाणी प्रवाहाला बाधा होईल, अशा पद्धतीने बांधकाम केल्याने शेजारच्या आपल्या घराला धोका निर्माण झाला असल्याचा आरोप कारिवडे-पेडवेवाडी येथील दत्ताराम गावडे यांनी करीत संबंधितांवर कारवाई व्हावी, यासाठी दत्ताराम गावडे यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. सायंकाळी उशिरा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मकरंद देशमुख यांनी ‘त्यांना आपल्या दालनात बोलावून घेत तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश ग्रामपंचायत विभागाला दिले जातील आणि योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले असल्याची माहिती गावडे यांनी दिली. गावडे यांचे कारिवडे येथे ९०६ क्रमांकाचे घर असून या घराच्या एका बाजूने नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत आहे. पावसाळ्यात तो पूर्णपणे प्रवाहित होतो. या प्रवाहाच्या वाटेवर धर्माजी गावडे यांनी प्रवाहाला अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने, तसेच आपल्या घराला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने दगडी चिऱ्यांचे पक्के बांधकाम केले आहे. हे बांधकाम नियमित वा कायदेशीर आहे, याबाबतची कोणतीच माहिती आपल्याला देण्यात आलेली नाही. तर प्रशासन तसेच तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या कागदी आदेशाला संबंधिताने दुर्लक्षित केल्याचे म्हटले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
