🛑 गावाच्या विकासासाठी उन वारा पाऊस तसेच आपल्या वयाची तमा न बाळगता स्वतः च्या दुचाकी वरून जिल्ह्याचे मुख्यालय गाठणारे माजी सरपंच कै. नामदेव धर्णे
🛑 लहान मुलां पासुन ते म्हाताऱ्या माणसां पर्यंत सर्वांची आपुलकीने विचारपूस करणारा हक्काचा माणूस काळाच्या पडद्याआड
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
||बारावा दिवस विशेष लेख ||
✍️ उपसंपादक : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-०३ :- आयुष्याच्या वाटेवर चढ उतार हे प्रत्येक माणसाच्या जीवनात येत असतात त्यावर मात करून आपले आयुष्य जगणे हा माणसाचा धर्म होय. पण या पेक्षा स्वतः चे जिवन जगताना इतरांसाठी जगतो तो देव माणूस होय. गल्ली पासून दिल्ली गाठली पण कोणताही बडेजाव नाही किंवा मोठे पणा नाही. उच्च विचार धारा आणि साधी राहणी मान घेवून लहान मुलां पासून ते म्हाताऱ्या शिताऱ्यांची आपुलकीने विचारपूस करणारा आणि नेहमी ग्राम विकासचा ध्यास मनात आणि तो आचरणात ज्यांनी आणला असे साटेली- भेडशी गावचे धडाडिचे माजी सरपंच आणि प्रगतशील शेतकरी म्हणून ज्यांनी नाव कोरले अशी वक्ती म्हणजे गावातील सर्व सामान्यांचा नामदेव भाई.
स्वतःच्या वयाची तमा न बाळगता गावाच्या विकासासाठी दुपारी २ वाजता कडाक्याच्या उन्हात आपली दुचाकी घेवून व गाडीच्या बॅलन्सला एक कागदपत्रांनी भरलेली पिशवी घेऊन जिल्ह्याचे मुख्यालय गाठण्याची क्षमता असलेले नेतृत्व म्हणजे नामदेव धर्णे.
नामदेव धर्णे यांनी आपल्या कारकिर्दीत गावातील रस्ते, गटारे, पाण्याची सुवीधा तसेच स्मशान भूमी ची शेड बांधणे अशी विविध विकास कामे त्यांनी आपल्या सरपंच असलेल्या कारकिर्दीत केली.नामदेव धर्णे यांना श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्था यांच राज्यस्तरीय एकता गौरव पुरस्कार २०१६, स्वामी विवेकानंद सेवाभावी संस्था चा समाजरत्न पुरस्कार, श्री सिध्देश्वर स्वामी गुरु महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, कोरोची यांच्या वतीने राज्यस्तरीय समाज गौरव पुरस्कार, तसेच कृषी पदवी आणि पदविधारक संघटना दक्षीण सिंधुदुर्ग यांच्या वतीने प्रगतशील शेतकरी असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले.
सामाजिक कामां बरोबरच धार्मिक कार्यक्रमांची प्रचंड आवड..
आपला नर जन्म सार्थकी लावायचा असेल तर भक्ती मार्गा शिवाय पर्याय नाही. त्यामुळे आपली सर्व कामे सांभाळून गावातील प्रत्येक धार्मिक कार्यात त्यांचा मोलाचा वाटा असायचा. त्याच बरोबर साटेली- भेडशी उसप तिठा येथे असलेल्या प.पू. श्री राऊळ महाराजांच्या चरणाशी ते लिन असताना दिसायचे तसेच नामदेव धर्णे यांना भजन कीर्तन याची आवड होती.
आवशी बरी आसय मा..
रस्त्यात दिसलेल्या गावातील कुठल्याही म्हाताऱ्या बाईला आपली दुचाकी थांबवून आवशी बरी आसय मा.. औषध पाणी कसा चल्ला.. अशी आपुलकीने जणू ती आपली आई असे समजून तिला घरा पर्यंत देखील सोडून येणारे नामदेव धर्णे..
असा देव माणूस काळाच्या पडद्याआड गेला. त्यामुळे साटेली – भेडशी गावात मोठी पोकळीक निर्माण झाली आहे.

