आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 सावंतवाडीत ‘सावंत आय क्लिनिक’

🛑 नेत्रविशेषज्ञ डॉ. नेहा सावंत आता सावंतवाडी वासियांच्या सेवेत

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-०२:- सावंतवाडीच्या सुकन्या डॉ. नेहा सावंत यांनी गवळी तिठ्यावरील वैश्य हॉलसमोरील ‘तक्ष बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावर सावंतवाडी आणि जिल्हयातील नेत्र रुग्णांच्या सोयीसाठी ‘सावंत आय क्लिनिक’ सुरू केले आहे. डॉ. नेहा सावंत या नेत्रविशेषज्ञ असून त्यांच्याकडे १५ हजाराहून अधिक नेत्र रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचा तसेच या क्षेत्रातील दहा वर्षांचा अनुभव आहे. गुजरातमधील राजकोट, राजस्थानमधील उदयपूर आणि पुण्यामध्ये त्यांनी नेत्र रुग्णांची सेवा केली. मात्र त्यांना आपल्या मातृभूमीची ओढ असल्याने त्यांनी सावंतवाडी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना सेवा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी ‘सावंत आय क्लिनिक’ सावंतवाडीत सुरू केले आहे.
डॉ. नेहा सावंत या सावंतवाडीतील निवृत्त कर्नल विजय कुमार सावंत यांच्या सुकन्या, वडील सैन्यात असल्यामुळे त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण देशाच्या वेगवेगळ्या भागात झाले. त्यानंतर त्यांनी पुण्यात बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. बारावीनंतर त्यांनी मेडिकल फिल्डमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी धुळे येथील भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेजमधून नेत्र विषयातील एमबीबीएसची पदवी मिळवली. या कॉलेजमध्ये त्या पहिल्या पाच टॉप विद्यार्थ्यांत आल्या होत्या. पदवीनंतर त्यांनी पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये एक वर्षाची इंटरशिप केली. परंतु नेत्र विषयात उच्च शिक्षण घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी पावले उचलली. त्यासाठी त्यांनी ऑल इंडिया लेवलची पात्रता परीक्षा दिली. त्यात त्या उत्तीर्ण झाल्या उदयपूर येथील रवींद्रनाथ मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी ‘एमएस’ ही पदवी मिळवली. राजस्थान येथील वीरनगर, राजकोट येथील शिवानंद मिशन ट्रस्टने त्यांना फेकोची फेलोशिप दिली. तेथे त्यांनी तीन हजाराहून अधिक नेत्ररुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. त्यानंतर त्यांनी पुण्यात कोरेगाव पार्क येथील रुग्णालयात सेवा देण्यास सुरुवात केली. तेथे त्यांनी दीड हजारहून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या. पुणे बिबेवाडी येथील इएसआयसी ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांनी तीन हजार नेत्र शस्त्रक्रिया केल्या.
त्यांनी ठिकठिकाणी नेत्र रुग्णांची सेवा केली. परंतु मातृ‌भूमीची त्यांना ओढ लागली. त्यामुळे त्यांनी सावंतवाडीत नेत्र रुग्णांना सेवा देण्याचा निर्णय घेतला. सावंतवाडीत अलीकडेच त्यांनी ‘सावंत आय क्लिनिक’ सुरु करून नेत्र रुग्णांची सेवा करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा लाभ सावंतवाडीसह सिंधुदुर्गातील नेत्र रुग्णांना होणार आहे. त्यांच्या क्लिनिकमध्ये मोतीबिंदूवर बिन टाका बिनचूक शस्त्रक्रिया, फेको शस्त्रक्रिया, काचबिंदू तपासणी व उपचार, डोळ्यावरील पडयाची बिन टाका शस्त्रक्रिया, नेत्र पटलाच्या आजाराचे निदान व उपचार अशा सुविधा नेत्र रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. दवाखान्यात ओपीडी असणार आहे. तर नवांगुळ हॉस्पिटलमध्ये अंऑपरेशन थिएटर येथे रुग्णांवर आवश्यकता वाटल्यास शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत, माणसाच्या जीवनात डोळ्यांचे फार महत्व आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती डोळ्यांची काळजी घेत असते. मात्र अलीकडच्या काळात बदलत्या शैलीमुळे डोळ्यांचे आजारही वाढले आहेत. त्यामुळे लोक डोळ्यांच्या तज्ज्ञ डॉक्टरकडूनच तपासणी आणि उपचार करून घेत असतात. अशावेळी नेत्र विषयातील तज्ज्ञ असलेल्या डॉ. नेहा सावंत यांचा या क्षेत्रातील अनुभव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेत्र रुग्णांना वरदानच ठरणार आहे. दवाखान्याच्या उद्घाटनप्रसंगी कॅप्टन सतेद्र सिंग, डॉ. नेहा सावंत, निवृत्त कर्नल विजय सावंत, सौ. निर्मल सावंत तसेच सावंत यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!