🛑 भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा तृतीय वर्ष निकाल ९४%
🛑 राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे अभियांत्रिकी पदविका निकाल जाहीर
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-०२:- महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे पदविका अभियांत्रिकी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा निकाल ९४ टक्के लागला आहे. तृतीय वर्ष पदविका अभियांत्रिकी परीक्षेसाठी कॉलेजमधून एकूण २०४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
कॉलेजच्या सिव्हील इंजिनिअरिंग विभागाचा निकाल १०० टक्के लागला असून बाळकृष्ण सुशील परब ८८.५३ याने प्रथम, आदित्य दुर्गाप्रसाद जडये ८७.७४ याने द्वितीय व दिव्या दीपक परब ८३.१६ हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागाचा निकालही १०० टक्के लागला असून पूजा बाबू लांबर ८९.०६ हिने प्रथम, शार्दुल दत्तप्रसाद जोग ८५.५६ याने द्वितीय व वेदांगी संदीप नलावडे ८४.६१ हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाचा निकाल ९६ टक्के लागला असून स्टेफीरोज पीटर मोंटेरो ८९.८९ हिने प्रथम, सोनल सुनील गावडे ८८ हिने द्वितीय व सुयश सतीश केरकर याने ८७.३७ तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. कॉलेजच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचा निकाल ८३ टक्के लागला असून सुयोग चारुदत्त जोशी ८८.४१ याने प्रथम, अनिरुद्ध अजय नाईक ८६.८७ याने द्वितीय व शुभम सुरेश मोडक ८४.७७ याने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, प्राचार्य डॉ.रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले, सिव्हील विभागप्रमुख प्रसाद सावंत, इलेक्ट्रिकल विभागप्रमुख दीपक पाटील, कॉम्प्युटर विभागप्रमुख प्रशांत काटे व मेकॅनिकल विभागप्रमुख अभिषेक राणे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

