पर्यावरणाच्या संवर्धनासाठी परुळे येथे ‘निसर्गरक्षक’ पर्वाची सुरुवात..
*🛑पर्यावरणाच्या संवर्धनासाठी परुळे येथे ‘निसर्गरक्षक’ पर्वाची सुरुवात..*
*🛑परुळे येथील युवाईने एकत्र येत केली १०० वृक्षांची लागवड..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :समीर चव्हाण*
*🎴वेंगुर्ले/ परुळे , दि- ०१:-* सद्या संपूर्ण जग उष्णता, दुष्काळ, हवा प्रदूषण, महापूर, भूस्खलन यासारख्या नैसर्गिक आपत्तीने त्रस्त होत असल्याचे आपण अनुभवत आहोत. यामागे कुठेतरी मानवाने केलेली निसर्गाशी छेडछाड त्यातही प्रामुख्याने वृक्षतोड हे कारण ठळकपणे दिसून येते. त्यामुळे निसर्ग रक्षणासाठी झाडे लावा झाडे जगवा हा संदेश पर्यावरण प्रेमिंकडून दिला जातो.
याच संदेशाचे अनुकरण करत परुळे येथिल निसर्गप्रेमींनी एकत्र येत ३० जून २०२४ रोजी सकाळी चीपी एअरपोर्ट च्या बाजूला असलेल्या येसुआका मंदीर परिसरातील सड्यावर १०० निसर्गोपयोगी वृक्षांची लागवड करण्यात आली. फक्त लागवड करून सोडून न देता उपस्थित प्रत्येकाने ही झाडे जतन करण्याची जबाबदारीही यावेळी स्वीकारली आहे.वड,पिंपळ,उंबर,अर्जुन,सुरंगीसिमारुबा, चिंच,जांभूळ,विलायती,चिंच,करंज,कडुनिंब अशी निसर्गासाठी उपयुक्त झाडे लावून परुळे येथील निसर्ग प्रेमींनी निसर्ग रक्षणाचा श्रीगणेशा केला. त्यांचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आणि इतरांनी अनुकरण करण्याजोगा आहे. पुढच्या पिढीसाठी जर आरोग्यदायी निसर्ग द्यायचा असेल तर वृक्ष लागवड करणे ही काळाजी गरज आहे.
यावेळी विजय घोलेकर, चिंतामणी सामंत, सिध्दीविनायक तेली, विश्राम मांजरेकर, शांताराम पेडणेकर, अभय परुळेकर, सुनाद राऊळ, अमोल तेली, गितेश वाडयेकर, विनायक जोशी, विघ्नेश नानचे, सृष्टी देसाई, संध्या माधव, सान्वी देसाई, प्रसाद तेली, सुरज मांजरेकर, ओमकेश मांजरेकर, विशाल वाडयेकर, बबलू शिरसाट, वामन वेंगुर्लेकर आणि संतोष राठीवडेकर हे “निसर्गरक्षक” उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

