निगुडे मार्गे सोनुर्ली एसटी बस पूर्वरत करा माजी सरपंच समीर गावडे यांची सावंतवाडी आगार व्यवस्थापक यांच्या कडे मागणी
*🛑निगुडे मार्गे सोनुर्ली एसटी बस पूर्वरत करा माजी सरपंच समीर गावडे यांची सावंतवाडी आगार व्यवस्थापक यांच्या कडे मागणी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴बांदा, दि- ०१:-* निगुडे मार्गे सोनुर्ली एसटी बस सेवा पूर्वरत करा तसेच सकाळी बांदा निगुडे मार्गे मडुरा सकाळी ०९:३० ची हायस्कूलच्या विद्यार्थीची बस नियमित वेळेवर करा अशी मागणी त्यांनी सावंतवाडी एसटी आगार व्यवस्थापक श्री निलेश गावित यांच्याकडे केली आहे सदर निवेदनात समीर गावडे यांनी असे म्हटले आहे की निगुडे सोनुर्ली बसची मागणी कित्येक वेळा करण्यात आली परंतु सदरची फेरी चालू करण्यास विलंब का? सदरची एसटी बस १० जुलै पर्यंत पूर्वरत करा त्याच प्रमाणे इतर बस सकाळी ०९:३० हायस्कूल मडुरा जाणारी बस नियमित वेळेत येत नसून सकाळी ०९:३० निगुडे येथे न येता १०:३० वाजता येते. पावसाळ्यात बस वेळेत न आल्याने विद्यार्थी शाळेत वेळेत न पोहचु शकल्यामुळे विद्यार्थी यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे जर बसचे पास वेळेवर काढूनही बसेस वेळेवर येत नाही याविषयी आपल्या वाहन चालकांना तसे आदेश द्या. दुपारी १२:३० बांद्यावरुन निघणारी बस स्थानकापासून उशीरा निघते त्यामुळे या सर्व घटनेची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी. तसेच निगुडे सोनुर्ली मार्गे सावंतवाडी रेल्वे स्थानक व रेल्वे स्थानक ते सोनुर्ली निगुडे मार्गे बांदा अशी बससेवा पूर्वरत करा अन्यथा १० जुलै नंतर आंदोलन्माक पवित्रा घ्यावा लागेल अशा इशाराही श्री. गावडे यांनी आगार व्यवस्थापक श्री. गावित यांना दिला. यावेळी निगुडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर जाधव उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

