कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिक

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळणार – आमदार नीतेश राणे

*🛑मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळणार – आमदार नीतेश राणे*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-२६*:-धर्माच्या नावाने कोणाला आरक्षण मिळत नाही. विविध जाती आहेत, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. मुस्लिम धर्मात पसवंदासारख्या मागास जाती आहेत, त्यांना आरक्षण द्या, आमची हरकत नाही. मात्र, धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यास आमचा विरोध राहील. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिले जाईल. कुठल्याही दुसऱ्या. समाजाचे एक टक्काही आरक्षण न हलवता, मराठा समाजाला आरक्षण मिळणार. त्यामुळे ओबीसी समाजाने घाबरण्याची गरज नाही. हिंदू समाजात जी फटाफूट होतेय, त्यामुळे नुकसान हिंदू धर्माचेच होतेय. याचा हिंदू धर्माच्या सुजाण नागरिकांनी विचार करावा, असे आवाहन भाजप प्रवक्ते, आमदार नीतेश राणे यांनी केले. पत्रकार परिषदेत बोलताना राणे म्हणाले, संजय राऊत यांनी ड्रग्ज या विषयावर बोलून आपल्या मालकाच्या मुलाला अडचणीत आणू नये. ‘उडता पंजाब’ नंतर ‘उडता मातोश्री’ चित्रपट कराढायची वेळ येईल. ‘मातोश्री’चा तिसरा मजला ड्रग्जचे केंद्र आहे. अमली पदार्थांचे धागेदोरे ‘मातोश्री’वरूनच मिळतील. कुंपण शेत खात आहे हे लक्षात घ्या. तुमच्या मालकाचा मुलगा ड्रग्जवाल्या लोकांसोबत का असतो? रिझवी कॉलेजच्या मागे असलेल्या बंगल्यात कोणाला भेटतो? अडीच वर्षे महाविकास आघाडीची सत्ता होती. तुमचे मालक उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. तेव्हा ड्रग्ज थांबले का नाही? त्यासाठीं तुम्ही काय प्रयत्न केले? तुमचे गृहमंत्री देशमुख हप्ता वसुलीत जेलमध्ये गेले होते, अशी खरमरीत टीका नीतेश राणे यांनी केली. कंगना राणावत यांनी महाराष्ट्र सदनमध्ये जाऊन राहण्याबाबत विचारपूस केली. त्यांना प्रशासनाने नाही म्हटलं, त्या निघून गेल्या. यावर संजय राऊत यांना मिरच्या झोंबल्या. कंगना या निवडून गेलेल्या खासदार आहेत. तुमच्या सारख्या ‘बैंक डोअर’ आलेल्या नाहीत. कंगनाने महाराष्ट्र सदनमध्ये राहायला मिळेल काय?, असे विचारले तर टीका करता. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वर्षा बंगल्यावर सचिन वाझे तिकडे किती दिवस राहायचा? त्याचे उत्तर कधी देणार? असा सवाल केला.’ हमाम में सब नंगे है!’ उगाच बडबड करू नका, असेही ते म्हणाले. उज्ज्वल निकम यांनी कसाबला फाशी देण्यास मदत केली. मात्र, असंख्य दहशतवादी, बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांची बाजू घेणारे मेनन वकील तुमच्या शरद पवारांच्या बाजूला बसतात. त्यांना कधी प्रश्न केला आहात काय? आमचे गृहमंत्री सक्षम आहेत. तुमच्या वसुली सरकारपेक्षा आमचे सरकार सक्षम आहे. वेळ आली, तर इग माफियांना चौकात फाशी देऊ, असेही राणे म्हणाले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!