कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिक

कणकवली : आयोडिनयुक्त मिठाचाच वापर

*🛑कणकवली : आयोडिनयुक्त मिठाचाच वापर*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-२५*:-आयोडिन न्यूनता विकार कार्यक्रमांतर्गत आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जाते. यात वापरण्यात येत असलेले मीठ हे आयोडिनयुक्त आहे, की नाही, याची पडताळणी आशा स्वयंसेविकांना देण्यात आलेल्या किटच्या माध्यमातून केली जाते. तसेच काही नमूने तपासणीसाठी प्रयोगशाळेतही पाठविण्यात येतात. कणकवली तालुक्यात २०२३-२४ मध्ये आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून आठ हजार नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात आयोडिनयुक्त नसलेला केवळ एकच नमूना मिळाला. तर प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या तपासणीमध्ये ४० पैकी एकाही नमून्यात आयोडिन नसल्याचे आढळून आलेले नाही.. गलगंड या आजाराच्या नियंत्रणासाठी आयोडिनयुक्त मिठाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येते. त्या अंतर्गतच शासनाकडून १९९२ पासून आयोडिन न्यूनता विकार कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सद्यस्थितीत याबाबतच्या सर्वेक्षणाचे काम आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून करण्यात येते. गेल्या दोन वर्षांपासून आशा स्वयंसेविकांना किट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या किटच्या माध्यमातून मिठातील आयोडिनची तपासणी आशा स्वयंसेविका करतात. या किटमधील सोल्यूशन मीठ नमुन्यात मिक्स केल्यानंतर त्यांच्या रंगावरून त्या मिठात आयोडिन आहे, नाही किंवा कमी आहे हे दिसून येते. यापूर्वी सर्वेक्षणांतर्गत घेण्यात आलेले सर्व नमूने प्रयोगशाळांमध्ये ‘ तपासणीसाठी पाठविण्यात येत होते, आता आशा स्वयंसेविकांमार्फत तपासणी होत असली, तरीही काही नमूने प्रयोगशाळेतही पाठवून खात्री करून घेण्यात येते.आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून घरोघरीच्या सर्व्हसोबतच ज्याठिकाणी शाळांमध्ये पोषण आहार शिजवून देण्यात येतो, तेथे वापरण्यात येत असलेले मीठ, आयोडिनयुक्त आहे का? याचीही तपासणी करण्यात येते. त्यानुसार २०२३-२४ मध्ये तालुक्यात आशा स्वयंसेविकांनी ज्या आठ हजार नमून्यांची तपासणी केली, त्यात केवळ एकच नमूना आयोडिनयुक्त मीठ नसल्याचा आढळला. तर प्रयोगशाळेकडे पाठवून ४० नमून्यांची तपासणी करण्यात आली. ते सर्व नमूनेही आयोडिनयुक्त मीठ असल्याचे आढळून आले असल्याची सुत्रांकडून माहिती देण्यात आली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!