🛑 ठेकेदाराचा हलगर्जीपणा बेततोय प्रवाशांच्या जिवावर ; साटेली भेडशी खालचा बाजार येथील “त्या” रस्त्याच्या खचलेल्या मोरीत आज सकाळ पासून दोन अपघात
🛑 तात्काळ उपाययोजना न केल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालणार ; उबाठा शिवसेना उपतालुकासंघटक संदेश वरक
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-२४:- दोडामार्ग विजघर मुख्य राज्य मार्गावरील साटेली-भेडशी खालचा बाजार येथील पुला नजीक नव्याने बांधण्यात आलेली मोरी पुर्णपणे खचली असुन या खचलेल्या मोरीचा अंदाज न आल्याने दोन दुचाकी स्वारांचा अपघात झाल्याची घटना आज सकाळी येथे घडली आहे. या अपघातात शिरंगे येथील प्रकाश आत्माराम गवस हे जखमी झालेत तर तसेच अजून एक दुचाकीस्वार या मार्गावरून प्रवास करताना जखमी झालेत. या खचलेल्या मोरीबाबत दोन दिवसां पासून प्रसिद्धी माध्यमां द्वारे बातम्या प्रसिद्ध होत आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या कडे कानडोळा करतात. त्यामुळे या झालेल्या अपघाताला संपूर्ण पणे संबंधित ठेकेदार व अधिकारी जबाबदार आहेत असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपतालुका संघटक संदेश वरक यांनी केला आहे.
त्यामुळे तात्काळ संबंधित अधिकारी व ठेकेदाराने या खचलेल्या मोरीची दुरुस्ती करावी अन्यथा उबाठा शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालणार असा इशारा दोडामार्ग उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपतालुका संघटक संदेश वरक यांनी दिला आहे.
दोन वर्षांपूर्वी या पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र अधिकाऱ्यांच्या पाठींब्यामुळे हे काम ठेकेदाराने अतिशय नित्कृष्ट दर्जाचे केल्याने अशा समस्यांना वाहनधारकांना सामोरे जावे लागत आहे.
हा मुख्य राज्यमार्ग असल्याने या मार्गावर वाहनांची वर्दळ ही मोठ्या प्रमाणावर होत असते याची कल्पना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली असता त्यांच्याकडून त्याठिकाणी पुर्णपणे दुर्लक्ष होताना दिसुन येत आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

