आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या “त्या” वयोवृद्ध व्यक्तीला सामाजिक बांधिलकी मदत ; त्यांना सुखरूप पोहोचवले घरी..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२४:– येथील बाहेरचावाडा परिसरात बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या वयोवृद्ध व्यक्तीला सामाजिक बांधिलकी व सावंतवाडी पोलिसांच्या माध्यमातून सुखरूप घरी पोहोचवण्यात आले. नामदेव तोरस्कर रा. आकेरी असे संबंधित व्यक्तीचे नाव असून काल फिट आल्याने ते बाहेरचावाडा परिसरातील रस्त्याच्या कडेला बेशुद्ध होऊन पडले होते.

दरम्यान नशेत कोणीतरी पडले असावे असा समज झाल्यामुळे नागरिकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केला. मात्र सायंकाळपर्यंत ते त्या ठिकाणीच बेशुद्ध अवस्थेत असल्याने याची कल्पना इम्तियाज राजगुरू यांनी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांना दिली. श्री. जाधव यांनी संबंधित व्यक्तीवर प्राथमिक उपचार करून त्यांना शुद्धीवर आणले. दरम्यान शुद्धीवर आल्यानंतर आपण आकेरी येथील असून कामानिमित्त या ठिकाणी आलो होतो, अचानक फिट आल्याने मी येथे बेशुद्ध झालो, असे त्यांनी सांगितले. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्यात कळविल्यानंतर पोलीस अनिल धुरे व श्री. डिसोझा घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान त्यांनी सांगितलेल्या पत्त्यानुसार त्यांना सुखरूप घरी पोहोचवण्यात आले. याबाबत संबंधित वयोवृद्ध व्यक्तीच्या कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी व पोलिसांचे आभार मानले.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!