आणखीकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

🛑 वारंवार कोसळणाऱ्या परशुराम घाटाच्या नुकसानी जबाबदारी कोणाची?

🛑 दुरुस्तीच्या नावाखाली लाखोंची उधळपट्टी की संबंधित ठेकेदाराकडून अधिकारी काम करून घेणार?

🛑 नागरिकांकडून उमठत आहेत संतप्त प्रतिक्रिया

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण, दि-२२:- प्रत्येकवर्षी पावसाळा सुरू झाला की परशुराम घाट खचण्याचा कार्यक्रम नित्य नियमाचा झाला आहे . शासनामार्फत महामार्गाचे काम नेमून दिलेल्या ठेकेदाराची जबदारी काय आहे. सवरक्षक भित आणि कठाडा चे काम कायम स्वरुपी चांगल्या दर्जाचे कधी होणार राष्ट्रीय महामार्ग विभाग ठरलेल्या अंदाज पत्रकानुसार काम करून घेणार की ठेकेदाराला प्रत्येकवेळी दुरुस्तीच्या नावाखाली पैसे वाढून देणार या बाबत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती नागरिकांना दिली जात नाही.चौपदरीकरण कामात दिरंगाई तर झालेली आहेच शिवाय निषकृष्ठ कामाबाबत अनेकवेळा तक्रारी होऊनही शासन नागरिकाच्या तक्रारीला कैराची टोपली दाखवत आहे . कामाच्या सुरवातीला देखील कामगार वर्ग ,प्रवासी,वाहनधारक यांचा अपघातामध्ये नाहक बळी गेला आहे.पेढे,परशुराम मधील ग्रामस्थ तर आपला जीव मुठीत धरून जीवन जगत आहेत. दर्जाहीन चौपदरीकरण कामाचा खेड ,चिपळूण तालुक्यातील जनतेला नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे,शिवाय जनता कर स्वरूपात शासनाकडे पैसे जमा करते त्या पैशाचा वापर अशा प्रकारे ठेकेदाराचे पोट भरण्यासाठी प्रशासन करीत आहे का असा सवाल जनतेतून विचारला जात आहे.दरम्यान एरवी नागरीकांच्या अन्य समस्यांबाबत ओरडत असणाऱ्या पुढाऱ्यांकडून या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

गुरुवारपासून कोसळत असलेल्या

मुसळधार पावसाने शुक्रवारी पहाट ५. ३० च्या सुमारास मुंबई-गोवा

महामार्गावरील परशुराम घाटात

बांधली गेलेली संरक्षक भिंत व

सर्व्हिस रोडसाठी केलेला भराव

कोसळला. सुमारे २०० मीटरचा

भाग खचला असून सर्व्हिस रोडलाही

तडे गेले आहेत. कोसळत असलेला

पाऊस आणि धोकादायक स्थिती.

लक्षात घेऊन प्रशासनाने खचलेल्या

भागाकडील मार्गिका वाहतुकीसाठी

बंद करत पोलिसांसह प्रशासकीय

यंत्रणा ठाण मांडून बसली आहे.

दरम्यान, कोसळलेल्या बांधकामामुळे

महामार्ग कंत्राटदार कंपनीच्या

बोगस कामांचा पर्दाफाश झाल्याचा

आरोप सामाजिक कार्यकर्ते

रुपेश पवार यांच्यासह अनेक

नागरिकांमधून करण्यात आला.

दरम्यान या प्रकरणी आता जनतेनेच रस्त्यावर उतरून अधिकारी आणि ठेकेदार यांना वठणीवर आणण्यासाठी कडक मार्ग अवलंबिला पाहिजे अशी भूमिका अनेकांनी येथे बोलताना व्यक्त केली आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील रस्त्यालगत केलेला भराव गुरुवारी झालेल्या पावसाने कोसळला आणि हा रस्ता धोकादायक बनला आहे. आता भिंत बांधण्यात येणार अस सांगणाऱ्या वरीष्ठ अभियंत्यास जेंव्हा पहिल्यांदाच माती कोसळली तेंव्हाच हे नाही का सुचल की ठेकेदाराला पोसायची अधिकारी वर्गाची भूमिका आहे असा सवाल जनतेतून विचारला जात आहे.

गेले दोन दिवस कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. शुक्रवारच्या जोरदार पावसात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंतीसह

मातीचा भराव कोसळण्याची घटना पहाटे ५.३० वा. च्या

८ ५.३० वा. च्या सुमारास घडली. सुमारे दोनशे मीटरचा भाग खचला असून परिसरातील काही भाग कधीही ढासळण्याच्या स्थितीत आहे. डोंगर उतारावरून येणाऱ्या पाण्यामुळे ही घटना घडली असून यामुळे महामार्गालगतच्या बायपास रस्त्यालाही तडे गेले आहेत. पहिल्याच पावसात घाटातील नवीन कामाचे ‘तीनतेरा’ वाजल्याने कामाच्या दर्जाबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच खेड व चिपळूणचे

प्रशासन, पोलीस यंत्रणा व एनडीआरएफची टीम यांनी

घटनास्थळी धाव घेत पाहाणी केली. तसेच या ठिकाणी चौवीस तास यंत्रणा तैनात करण्यात आली असून महामार्गावरून एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील

चौपदरीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!