🛑 कलंबिस्त हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : नाना धोंड
🎴सावंतवाडी, दि-२२:- कलंबिस्त हायस्कूलमधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च, 2024(इ.दहावी) मध्ये उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडीचे सहाय्यक अभियंता श्री. विजय चव्हाण उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष शिवाजीराव सावंत सचिव यशवंत राऊळ, सहसचिव चंद्रकांत राणे, संचालक शशिकांत धोंड, वसंत सावंत, प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव, सार्वजनिक बांधकामचे श्री.राणे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते एस्.एस्.सी परीक्षेत प्रशालेत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या व विविध विषयांत सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा.. यामध्ये प्रथम-संकेत कृष्णा जाधव (90%),कु.आर्या रामचंद्र सावंत (90%), द्वितीय-कु.अमृता अरविंद पास्ते(87.40%), तृतीय- कु.तन्वी दशरथ पास्ते(85.40%) देणगीदारांनी ठेव म्हणून ठेवलेली पारितोषिके देऊन सत्कार करण्यात आला. या सत्काराबद्दल विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करुन संस्था व प्रशाला यांचे आभार मानले.
या कार्यक्रमात प्रमुख अतिथी सहाय्यक अभियंता विजय चव्हाण यांनी जिद्द, चिकाटी आणि सातत्यापूर्ण प्रयत्नाने यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड गुणवत्ता असते. योग्य मार्गदर्शनाने आपण स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून ही गुणवत्ता सिद्ध करा, योग्य करिअर घडवा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.. संस्थाध्यक्ष शिवाजीराव सावंत यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पालक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनी, सूत्रसंचालन शिक्षक किशोर वालावलकर यांनी तर आभारप्रदर्शन शिक्षिका विनिता कविटकर यांनी केले.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

