आजही अनेक शाळा भरतात सकाळी नऊच्या पूर्वी
*🛑आजही अनेक शाळा भरतात सकाळी नऊच्या पूर्वी*
*🛑शिक्षण विभाग अनभिज्ञ, या गोंधळाला जबाबदार कोण? : शासनाच्या आदेशाचे काय?*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-२२*:-शासनाने गतवर्षी काढलेल्या परिपत्रकानुसार पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ वाजण्यापूर्वी न भरविण्याचे आदेश दिले. मात्र, आजही अनेक खासगी संस्थांच्या शाळा नऊ वाजण्यापूर्वी भरविण्यात येत असल्याचे दिसून येते. तसेच शाळेच्या वेळांमध्येही अनेक बदल करण्यात आले असून शिक्षण विभागाला याची कल्पनाही नसल्याचे दिसून येते. दुसरीकडे योग दिनानिमित्त प्राथमिक शाळाही सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत भरविण्याच्या सूचना सुरुवातीला देण्यात आल्या. रात्री उशिरा ही वेळ १२ पर्यंत करण्यात आली. त्यामुळे शिक्षण विभागातील हा सावळागोंधळ नेमका कधी थांबणार? असा सवाल केला जात आहे.शासनाने गतवर्षी काढलेल्या परिपत्रकानुसार पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊपूर्वी न भरविण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार अनेक खासगी संस्थांकडून शाळांच्या वेळांमध्ये बदल केले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी या शाळा सकाळी ८.३० अथवा ८.४० वा. भरविण्यात येतात. त्यामुळे नऊ वाजण्यापूर्वी शाळा भरविल्यास कारवाई करण्याच्या आदेशाचे काय? असा सवाल केला जात आहे. अनेक शाळांनी दुपारी मुलांना सोडण्याच्या वेळांमध्येही बदल केले आहेत. मात्र, या बदलांबाबत शिक्षण विभागही अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. वास्तविक, मुलांना किती तास शाळेत थांबवावे, याबाबतही काही निश्चित धोरण असण्याची गरज आहे. मात्र, दुर्दैवाने तशाप्रकारे कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही.शुक्रवारी योग दिनानिमित्त प्राथमिक शाळा सकाळी ७.३० ते ११.३० यावेळेत भरविण्यात याव्यात, अशा सूचना गुरुवारी दुपारी देण्यात आल्या. त्यानुसार विद्यार्थी, पालकांना कळविण्यात आले. त्यानंतर रात्री पुन्हा या वेळेत बदल करत शाळा दुपारी १२ पर्यंत सुरू ठेवण्यास कळविण्यात आले. शिक्षण विभागाच्या या गोंधळाच्या कारभाराला जबाबदार कोण? शिक्षण विभागात गेल्या काही कालावधीपासून सुरू असलेला हा गोंधळ नेमका थांबणार कधी? असा सवाल उपस्थित होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

