कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

कुडाळ मतदारसंघासाठी अर्थसंकल्पातून भरीव निधी द्या!

*🛑कुडाळ मतदारसंघासाठी अर्थसंकल्पातून भरीव निधी द्या!*

*🛑नीलेश राणेंची मागणी : दोन्ही तालुक्यांच्या विकासाचा बॅकलॉग’ भरून काढण्याचा संकल्प !*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-२०*:-येत्या काही दिवसांत पावसाळी अधिवेशन सुरू होणार असून या अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर होईल. लोकसभा निवडणुकीनंतर व विधानसभा निवडणुकीच्या आधी अर्थसंकल्प सादर होत असल्याने संपूर्ण राज्याचं लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागले आहे. कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघासाठी या अर्थसंकल्पातून भरीव निधी मिळावा, अशी मागणी भाजपचे कुडाळ-मालवण विधानसभा निवडणूकप्रमुख नीलेश राणे यांनी केली आहे.कुडाळ व मालवण तालुक्यात विकासकामांचा मोठा ‘बॅकलॉग’ असून गेल्या दहा वर्षांत इथे विकासनिधी मिळाला नाही.या अर्थसंकल्पात मालवण किनारपट्टीवरील देवबाग, तळाशील खाडी, मसुरकर खोत जुवा, मेढा राजकोट, सर्जेकोट पिरवाडी, रेवंडी भद्रकाली मंदिर, कुडाळ तालुक्यातील भंगसाळ नदी किनारी असे सर्व ठिकाणी धूप प्रतिबंधक बंधारे बांधणे, काळसे बागवाडी संरक्षक बंधारा, बहुप्रतिक्षित सोनवडे-घोटगे घाटरस्ता, विकासाचा आंजिवडे माणगाव खोऱ्याच्या दरवाजा उघडणारा घाटरस्ता, सिंधुदुर्ग जिल्हयाच्या जिव्हाळ्याचा विषय असलेले जिल्हा रुग्णालय व्यवस्था बळकटीकरण, कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे अद्ययावत शवागृह, कुडाळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व ग्रंथालय, सिंधुदुर्गनगरी प्रवेशद्वारावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा यासह कुडाळ व मालवण तालुक्यातील गावांतर्गत खड्डेमय झालेले रस्ते, प्रमुख वर्दळीचे मार्ग तसेच विविध विकासकामांसाठी भरीव निधीची मागणी नीलेश राणे यांनी केली आहे.शिंदे-फडणवीस सरकारकडून कुडाळ मतदारसंघासाठी विकासनिधीची मागणी पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करत राणे यांनी मतदारसंघातीलं प्रत्येक घटकापर्यंत पोहोचता यावं,यासाठी योग्य नियोजन करून व आराखडा बनवून अर्थसंकल्पासाठी मागणी केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!