पत्रकारांचे आराध्य दैवत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाच्यावतीने अभिवादन..
▪️पत्रकारांची पंढरी पोंभुर्ले येथे अत्यंत साधपणाने पत्रकार दिन साजरा..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि.०६: पत्रकारांचे आराध्य दैवत आणि पत्रकारांची पंढरी समजले जाणारे आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी पोंभुर्ले येथे आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाच्यावतीने बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कोरोनाच्या सावटामुळे यावर्षी अत्यंत साधपणाने पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी पोंभुर्ले येथे पत्रकार दिन दरवर्षी साजरा करण्यात येतो. मात्र, यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणारा हा सोहळा व पुरस्कार वितरण सोहळा रद्द करण्यात आला होता. मात्र, प्रतिवर्षाप्रमाणे तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाच्या वतीने बाळशास्त्रींच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.
तसेच पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक रवींद्र बेडकीहाळ, रत्नागिरीचे जेष्ठ पत्रकार व नारळ विकास बोर्डाचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये, जि.प.सदस्य प्रदिप नारकर, सरपंच सादिक डोंगरकर, सुधाकर जांभेकर, अमर आडके, सौ. बेडकीहाळ, तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय मारकड, उपाध्यक्ष उदय दुधवडकर, सचिव संजय खानविलकर, दै. रत्नागिरी टाइम्सचे वैभववाडी प्रतिनिधी संजय शेळके, अनिल राणे, संपदा राणे, तळेरे येथील दळवी काँलेजचे प्राध्यापक श्री. हादकर आदीसह ग्रामस्थांनी सहभागी होऊन बाळशास्त्रींना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावर्षी अत्यंत साधपणाने पत्रकार दिन साजरा करण्यात आला. राज्यभरातील पत्रकार कोरोनाच्या सावटामुळे व जिल्हाधिकारी यांनी जाहीर कार्यक्रमाला परवानगी दिली नाही. त्यामुळे राज्यभरातील पत्रकार उपस्थित राहू शकले नाहीत.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_