वाडा : घरफोडीप्रकरणी दोन संशयित मुंबईतून ताब्यात
*🛑वाडा : घरफोडीप्रकरणी दोन संशयित मुंबईतून ताब्यात*
*🛑 १९ पर्यंत पोलीस कोठडी : मुख्य संशयितही जाळ्यात? : मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴देवगड, दि-१५*:-वाडा भटवाडी येथील घरफोडी प्रकरणातील दोन संशयितांच्या मुसक्या आवळण्यात देवगड पोलिसांना यश आले असून दोन्ही संशयितांना मुंबई- डोबिवली येथून ताब्यात घेण्यात आले आहे. प्रणव राजन नारिग्रेकर (२६, मूळ रा. इळये पाटथर, सध्या रा. पितृछाया अपार्टमेंट, राम मंदिरनजीक, जुने डोंबिवली), हरिश दिलीप आचरेकर (१९, मूळ रा. वाडा आचरेकरवाडी, सध्या रा. वापी, सिल्व्हासा, गुजरात) अशी संशयितांची नावे आहेत. दोन्ही संशयितांना देवगड पोलिसांनी अटक करून कणकवली न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडा भटवाडी येथील वैशाली गोपीनाथ घाडी (६५) यांचे बंद कौलारू घर अज्ञात चोरट्याने फोडून घरातील चार लाखाच्या रोकडीसह १ लाख ५५ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, ३ हजार रु. किमतीचा टीव्ही, ४ हजार रु. किमतीचा कॅनॉन कॅमेरा असा सुमारे ५ लाख ६२ हजाराचा मुद्देमाल लंपास केला होता. ही घटना १६ मे ते ६ जून या कालावधीत घडली होती. या प्रकरणी वैशाली घाडी यांनी देवगड पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार देवगड पोलिसांनी अज्ञात संशयिताविरुद्ध भादंवि कलम ३८०, ३५७ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना संशयित प्रणव नारिग्रेकर व हरिश आचरेकर यांच्यावरील संशय बळावला होता. मोबाईल लोकेशनच्या आधारे या दोन्ही संशयितांना मुंबईतून डोंबिवली येथून ताब्यात घेण्यात आले. या संशयितांकडून चोरीतील कॅनॉन कंपनीचा कॅमेरा पोलिसांनी हस्तगत केला आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अरुण देवकर करीत आहेत.
*मुख्य संशयित ताब्यात?*
दरम्यान, वाडा घरफोडीप्रकरणी देवगड पोलिसांनी दीन संशयितांना अटक केली असली, तरी या घटनेत अन्य एक मुख्य संशयित असण्याची शक्यता आहे. या मुख्य संशयितास पोलिसांच्या पथकाने विरार येथून ताब्यात घेतले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली असून मुख्य संशयिताला शनिवारी देवगड पोलीस स्थानकात आणण्यात येणार असल्याचे समजत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

