तिलारी पाईपलाईनसाठीची रस्ता खोदाई ग्रामस्थांनी रोखली
*🛑तिलारी पाईपलाईनसाठीची रस्ता खोदाई ग्रामस्थांनी रोखली*
*🛑’बांधकाम’च्या परवानगीशिवाय सुरू होते काम*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि-१२*:-तिलारी येथून वेंगुर्ले तालुक्यात येणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईनच्या कामास आमचा विरोध नाही, पण सर्व परवानाग्या घेऊन ते काम व्हावे. कारण पावसाळ्यात काम करताना रस्ता खोदलेल्या जागी सिमेंटीकरण करून केलेला रस्ता टिकणार नाही. सदर जागी डांबरीकरणच व्हायला हवे, अशी धारणा असलेल्या नवाबाग ग्रामस्थांची आहे. तिलारी येथून वेंगुर्ल्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेसाठी पाईपलाईन टाकण्याचे काम सध्या उभादांडा मानसीश्वर येथे रात्रीचे गुपचुपपणे सुरू आहे. यासाठी रस्त्यावर खोदकाम केल्याने मंगळवारी ग्रामस्थांनी हे काम रोखले. हे काम करण्यासाठी ठेकेदाराने सार्वजनिक बांधकाम खात्याची परवानगीच घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेऊन हे काम रोखून धरले.पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्यावर खोदाई केली गेल्यास तेथे पडणारा चर योग्य पद्धतीने बुजविला गेला पाहिजे. ठेकेदाराने हे काम करताना रस्त्यावर खोदाई करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याची परवानगीच घेतली गेली नसल्याचे उघड झाले. रात्री गुपचूपपणे असे काम करणे चुकीचे आहे. कारण याच रस्त्यावरून नवाबाग येथे होणाऱ्या ब्रेकवॉटर कामासाठी मोठ्या डंपराची वाहतूक सतत सुरू आहे. रस्ता खोदकाम करून पडलेला चर सिमेंटीकरणाद्वारे भरला गेल्यास त्याचा काहीही उपयोग होणार नाही. उलट हा खड्डा वाढत जाऊन अपघात घडण्याची शक्यता आहे. हा रेडी-रेवस सागरी मार्ग असून येथून मोठ्या प्रमाणांत विविध वाहनांची वाहतूक सुरू असते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याची अधिकृत परवानगी घेऊन रस्ता खोदाईनंतर सदर भाग डांबरीकरणानेच मजबूत करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.यावेळी जि.प. माजी सदस्य विष्णूदास उर्फ दादा कुबल, भाजप जिल्हा युवामोर्चा उपाध्यक्ष भूषण आंगचेकर, युवा मोर्चा विधनसभा प्रमुख हितेश धुरी, उभादांडा शक्तीकेंद्र प्रमुख नीलेश मांजरेकर, मच्छीमार नेते दादा केळुसकर, माजी सरपंच देवेंद्र डिचोलकर आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
