कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत माजी खासदार डॉक्टर निलेश राणेच ठरले खरे किंग मेकर

🛑रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत माजी खासदार डॉक्टर निलेश राणेच ठरले खरे किंग मेकर

🛑रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात विनायक राऊत यांना मिळालेले आघाडी मंत्री उदय सामंत यांच्या साठी धोक्याची घंटा

🛑माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांनी केलेली टीका रास्तच

🛑कुडाळ मालवण मतदारसंघातून राणे यांना मिळालेले २७ हजाराचे मताधिक्य हे निलेश राणे यांच्या विजयाची नांदी

🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL

✍️ संपादकीय : सिताराम गावडे

🎴सिंधुदुर्ग, दि-१२:-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ व या मतदार संघाला लाभलेली विचारवंतांची परंपरा अखंडीत राहावी यासाठी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलच्या संपादकीय अग्रलेखातून आम्ही गुडघ्याला बाशिंग बांधून उमेदवारीसाठी तुळशीच्या लग्नाच्या आधीच हातात माळा घेऊन उभे राहणाऱ्या विरुद्ध कठोर शब्दात ताशेरे ओढले होते,आम्ही संपादकीय अग्रलेखात लिहिल्याप्रमाणेच ही जागा अखेर भाजपाच्या पारड्यात पडली व भाजपच्या कमळ निशाणी वर कोकणचा ढाण्या वाघ असे ज्यांना संबोधले जाते त्या नारायण राणे यांना अखेरच्या क्षणी उमेदवारी दिली गेली. भाजपने केलेल्या सर्वेक्षणात या मतदारसंघात इतर कोणीही उमेदवार दिला तर विनायक राऊतच विजयी होतील असा अहवाल भाजपला मिळाल्यामुळे त्यांनी लोकसभेसाठी नारायण राणे नाव पुढे करून त्याबाबतचा अहवाल मिळविला त्यावेळी नारायण राणे विजयी होतील असा सकारात्मक अहवाल मिळाल्याने भाजप नेतृत्वाने उमेदवारी नारायण राणे यांना दिली.
आम्ही तर निवडणुक जाहीर झाल्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत भाजपकडून नारायण राणे यांनाच उमेदवारी मिळणार हे जाहीर केले होते.सिंधुदुर्ग रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांचे कंत्राटदार भाऊ किरण सामंत हे लोकसभा लढविण्यासाठी इच्छूक होते तसे बघायला गेले तर किरण सामंत यांचा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ सोडला तर इतर लोकसभा मतदारसंघातील एकाही विधानसभा मतदारसंघाशी दुरान्वये संबंध नाही,ते सिंधुदुर्ग जिल्ह्यचे आपण सुपुत्र असल्याचे सांगत असले तरी येथील जनतेशी त्याचा संबंध नाही व सिंधुदुर्गात कोणतेही कार्यकर्तृत्व नाही केवळ कंत्राटदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते व जिल्ह्यातील मोठे ठेकेदार यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध आहेत एवढे मात्र खरे आहे.
आपल्या भावाच्या नावावर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा काबीज करण्याचा कोणीतरी प्रयत्न करत असेल व त्या प्रयत्नांतून जिल्ह्याचे व्यापारीकरण होत असेल तर जिल्ह्यातील सुजाण नागरिक म्हणून असे प्रयत्न निश्चितच हाणून पाडायला पाहिजे म्हणूनच आम्ही या मतदारसंघाला चुकीच्या माणसाचा हातात जाऊ नये यासाठी सडेतोड लिखाण केले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर अनेक जणांनी सामंत बंधू राणे यांचे काम करणार नाहीत त्यामुळे केंद्रीय मंत्री राणे यांची उमेदवारी धोक्यात आहे असे भाकीत केले होते,मात्र ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने राणेना आमदार पदापासून मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री पदापर्यंत पोहोचवले तो सिंधुदुर्ग जिल्हा नारायण राणे यांना टाकणार कसा हा मोठा यक्ष प्रश्न जिल्ह्यातील नागरिकां समोर उभा होता ,रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांना मिळालेले मताधिक्य रत्नागिरी जिल्हा टिकवू शकला नाही.त्या जिल्ह्यामध्ये सामंत बंधूंचे प्राबल्य आहे असे म्हटले जात होते त्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात सुद्धा नारायण राणे जवळपास ११००० मतांनी मागे राहिले तर चिपळूण राजापूर मतदार संघातही विनायक राऊत यांना आघाडी मिळाली मग सामंत बंधू स्वताचा मतदारसंघ टिकवू शकले नाहीत, त्यामुळे नैसर्गिकरीत्या रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी व राजापूर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी भाजपला मिळावी अशी मागणी माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांनी केली ती नैसर्गिक न्याय प्रक्रियेला धरुनच आहे असे आमचे ठाम मत आहे.
जर रत्नागिरी जिल्ह्यावर सामंत बंधूंचे किंवा पालकमंत्री उदय सामंत यांचे वर्चस्व असते तर नारायण राणे यांना रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात पिछाडी मिळाली नसती व याच मतदारसंघात उदय सामंत यांना मागिल विधानसभा निवडणुकीत जवळपास ७० हजार च्या पुढे मताधिक्य मिळाले होते ते मताधिक्य उदय सामंत का टिकवून ठेवू शकले नाहीत ,ज्या अर्धी ते हे मताधिक्य टिकवू शकले नाहीत याचा अर्थ त्यांचा शिवसैनिक किंवा कार्यकर्ता त्यांच्या सोबत शिंदे शिवसेनेत आला नाही, किंवा सामंत बंधूनी ठरवून राणेंचे काम केले नाही असाच होतो त्यामुळे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात नारायण राणे यांना मिळालेली पिछाडी ही पालकमंत्री उदय सामंत यांच्या साठी धोक्याची घंटा आहे व शिवसेना शिंदे गटाला आत्मपरीक्षण करायला लावणारी ही निवडणूक आहे एवढे मात्र निश्चित,
निलेश राणे यांनी केलेली टीका किंवा मागणी सामंत बंधूंच्या किंवा शिवसेना शिंदेगटाच्या एवढी जिव्हारी लागत असेल तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात राणे यांना मिळालेली पिछाडी त्यांच्या मुलांच्या जिव्हारी का लागू नये? हा आमचा सवाल आहे. तुळशीचे लग्न करताना दिंड्याची काठी लागते, नुसती हातात माळ घेऊन कोण उभा राहिला म्हणजे तुळशीचे लग्न होत नाही किंवा तो यजमानी ठरत नाही याचे भान किरण सामंत यांना राहिले नसेल म्हणून उतावीळ नवरा त्याचे गुडघ्याला बाशिंग या म्हणीप्रमाणे त्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता व तो त्यांचा दावा किती फोल होता हे या निवडणूक निकालावरून दिसून आले.सिंधुदुर्ग जिल्ह्याने नारायण राणे यांना मताधिक दिले नसते तर नारायण राणे पराभूत झाले असते ,मात्र ज्या जिल्ह्याने राणे यांना नाव दिले त्याच जिल्ह्याने नारायण राणे यांना तारले हे सूर्यप्रकाश एवढे सत्य आहे.
‌‌   सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उबाठाचे वैभव नाईक आमदार आहेत , दोन विधानसभा मतदारसंघात जवळपास दहा ते बारा हजारच्या फरकाने वैभव नाईक विजयी झाले होते, त्यामुळे या मतदारसंघात विनायक राऊत यांना दहा ते बारा हजार चे मताधिक्य मिळेल असा बऱ्याच जाणकारांचा अंदाज होता, मात्र निलेश राणे यांच्याशी बोलल्यावर त्यांनी या मतदारसंघात आम्ही १५००० च्या वर मताधिक्य घेऊ असा ठाम विश्वास व्यक्त केला होता ,ज्यावेळी निवडणूक झाली व मतमोजणीला सुरुवात झाली त्यावेळी कुडाळ मालवण मतदारसंघातून मिळालेले मताधिक्य पाहून सगळ्यांनीच तोंडात बोट घातले .सत्तावीस हजार चे मताधिक्य व कुडाळ मालवण मतदार संघातून नारायण राणे यांना मिळून देऊन निलेश राणे यांनी वडिलांच्या पराभवाचा वचपा काढला. .कुडाळ मतदारसंघातील प्रत्येक गाव पिंजून काढला, मतदारांच्या खांद्यावर हात टाकून त्यांना विश्वास दिला की निलेश राणे तुमच्यातीलच एक आहे,माणगाव खोऱ्यात तर घरोघरी फिरून निलेश राणे यांनी मतदारांशी सलोख्याचे संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला व त्यात ते यशस्वी झालेत व त्याचा परिपाक निवडणुकीतून दिसून आला, त्यामुळे उद्याची कुडाळ मालवण मतदारसंघाची निवडणूक ही विद्यमान आमदार वैभव नाईक यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे, या मतदारसंघात निलेश राणे यांनी आपल्या वडिलांना मिळून दिलेले २७००० चे मताधिक्य हे अजून कसे वाढेल याची व्यूहरचना डॉक्टर निलेश राणे व त्यांचे सहकारी आखत आहेत. तर कणकवली देवगड मतदारसंघातून आमदार नितेश राणे यांनीही आपले वडील नारायण राणे यांना ४१ हजाराच्या वर मताधिक्य देऊन आपला विधानसभा मतदारसंघ एक नंबर वर नेऊन ठेवला आहे व सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनीही ३१००० चे मताधिक्य नारायण राणे यांना देऊन आपले वर्चस्व या मतदारसंघावर कायम ठेवले आहे, मात्र तेच वर्चस्व उदय सामंत यांना टिकवता आले नाही ,त्यामुळे नैसर्गिकरित्या भाजप रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर भविष्यात दावा करू शकते.
डॉक्टर निलेश राणे यांनी किरण सामंत यांच्यावर केलेली टीका योग्यच असल्याचे आमचे मत आहे मतदानाच्या दिवशी नाॅट रिचेबल राहिलेले किरण सामंत कुठे गेले होते ?काय करत होते? निवडणूक काळात ते उद्धव ठाकरे यांना का भेटले?निवडणुकीच्या काळात विरोधी पक्षाच्या प्रमुखाला जाऊन भेटण्यामागचा हेतू काय?या सगळ्या प्रश्नांची उत्तरे निवडणूक निकालानंतर मिळून आली.. उदय सामंत यांच्या स्वतःच्या मतदारसंघात विनायक राऊत यांना मिळालेली मते ही निवडणुकीदरम्यान काय घडले हे सांगणारे बोलके उदाहरण आहे,यामुळे आता कोणी कितीही बाजू मारून नेण्याचा प्रयत्न केला तरी सत्य लपून राहत नाही, त्यामुळे डॉक्टर निलेश राणे यांनी भाजप नेतृत्वाकडे केलेली मागणी योग्य असल्याचे आमचे ठाम मत आहे, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात विनायक राऊत यांना मिळालेले मताधिक्य हे उदय सामंत यांच्यासाठी धोक्याची घंटा असल्याचे मानले जात आहे.व रत्नागिरी विधानसभा सभा मतदारसंघ हा पारंपरिक रित्या भाजप कडेच होता,भाजपचे आमदार त्या मतदारसंघातून निवडून येत होते, त्यामुळे त्या मतदारसंघावर सामंतांचे प्राबल्य संपले तर भाजपच निश्चितच दावा करु शकते व तो त्यांचा हक्क आहे.

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!