कोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडी

प्रांत कार्यालयात एकही दाखला प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेतो -प्रांताधिकारी -हेमंत निकम

*🛑प्रांत कार्यालयात एकही दाखला प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेतो -प्रांताधिकारी -हेमंत निकम*

*🛑मुलांच्या भवितव्याचा विचार करून दाखले त्वरित देण्याचे सूचना दिल्या आहेत*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-११*:-शालेय विद्यार्थ्यांचे दाखले व इतर दाखले आपल्या कार्यालयात कधीच पडून राहणार नाहीत ,विद्यार्थी शासकीय सोयी सवलती पासून वंचित राहू नयेत म्हणून असे दाखले आम्ही त्वरित वितरीत करतो ,एखाद्या विद्यार्थ्याने सेवा केंद्रामार्फत दाखल्यासाठी अर्ज केल्यानंतर तो प्रांत कार्यालयात दोन दिवसानंतर पोहोचतो व प्रांत कार्यालयातून त्या दाखल्याचा त्वरित निपटारा केला जातो असे सावंतवाडी प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी स्पष्ट केले आहे.
वेंगुर्ल्यातील विद्यार्थ्यांचे दाखले मिळाले नाहीत त्यासाठी घंटानाद आंदोलन करू अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल प्रतिनिधी ने प्रांत कार्यालयाशी संपर्क साधला असता प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी सदरची बातमी कशी प्रसिद्ध झाली? कोणी दिली? कोणत्या मुलांचे दाखले राहिलेत याबाबतची कोणतीही कल्पना आपल्याला नाही व माझ्या कार्यालयात असा कोणताही दाखला प्रलंबित नाही, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून माझ्या कार्यातील सगळ्या कर्मचाऱ्यांना शालेय दाखले त्वरित सही साठी पाठवा अशा सक्त सूचना मी दिल्या आहेत ,त्यामुळे माझ्या कार्यालयात अशा विद्यार्थ्यांचे कोणतेही प्रलंबित दाखले नाहीत व राहणार नाही याची दक्षता आम्ही घेत आहोत असे प्रांताधिकारी हे मन निकम यांनी म्हटले आहे.
एखादा दाखला सेतू सेवा केंद्रातून माझ्या कार्यालयापर्यंत पोहोचण्यास उशीर झाला असेल तर संबंधितांनी सेतू कार्यालयात तहसील कार्यालयात,चौकशी करणे गरजेचे आहे व माझ्या कार्यालयात दाखला प्रलंबित आहे असे निदर्शनास आल्यास त्वरित आपल्याशी संपर्क साधावा जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये चुकीचा संदेश जाणार नाही असे प्रांताधिकारी अधिकारी हेमंत निकम यांनी म्हटले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!