कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

मोपा विमानतळावर सिंधुदुर्गातील जास्तीत जास्त युवकांना सामावून घ्यावे,राजन तेली

मोपा विमानतळावर सिंधुदुर्गातील जास्तीत जास्त युवकांना सामावून घ्यावे,राजन तेली

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन केली मागणी

सावंतवाडी/प्रतिनिधीः मोपा विमानतळावर नव्याने होणाऱ्या भरती प्रक्रियेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत-जास्त युवकांना सामावून घेण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार तथा भाजप नेते राजन तेली यांनी आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे केली. दरम्यान सिंधुदुर्गातील टॅक्सी चालक मालकांना गोवा राज्यात परमिटच्या नावाखाली आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्यात शिथिलता देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना गोव्यात जाताना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. याबाबत लक्ष वेधण्यासाठी श्री. तेली यांनी आज श्री. सावंत यांची भेट घेतली. यावेळी विविध विषयावर चर्चा झाली. यात आरोग्य व्यवस्था आणि या संदर्भातील विषय किंवा गोवा पत्रादेवी हद्दीवरील स्थानिक लोकांना होणारा त्रास याबाबत उपाययोजना याकडे श्री. तेली आणि मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. याबाबत आपण सकारात्मक भूमिका नक्कीच घेऊ, असे आश्वासन श्री. सावंत यांनी तेली यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!