कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिक

दोन महिने झाले, तरी पुरुष कक्ष बंदच

*🛑दोन महिने झाले, तरी पुरुष कक्ष बंदच*

*🛑कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार :अंतर्गत दुरुस्तीच्या कारणास्तव कक्ष बंद*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-०३*:-अंतर्गत दुरुस्तीसाठी बंद असलेला कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील पुरुष कक्ष दोन महिने उलटले, तरीही बंदावस्थेतच आहे. दुरुस्ती कामाचा वेग लक्षात घेता हा कक्ष रुग्ण सेवेसाठी कधी मोकळा होणार, दुरुस्ती कामाला एवढा वेळ का लागत आहे, असे प्रश्न नागरिकांकडून विचारले जात आहेत.राज्य शासनाच्या बांधकाम विभागाकडून रुग्णालयातील काही अंतर्गत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे एप्रिलच्या सुरुवातीला रुग्णालयातील पुरुष कक्ष बंद करण्यात आला व तेथे दुरुस्ती सुरू करण्यात आली. पुरुष कक्ष बंद केल्यानंतर सर्व पुरुष रुग्णांना स्त्री कक्षामध्ये हलविण्याची वेळ आली. कक्षाचे काम पूर्ण होत नसल्याने एक वेळ अशीही आली की, रुग्णालयात बेड कमी पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून बांधकाम विभागाचे सातत्याने लक्ष वेधण्यात आले. मात्र,पुरुष कक्षाची दुरुस्ती अद्याप तरी पूर्ण झालेली नाही.दुरुस्ती कामास विलंब का? पुरुष कक्षाची दुरुस्ती पूर्णत्वास जात नसल्याबाबत रुग्णालयीन कर्मचाऱ्यांनाही मनःस्तापाला सामोरे जावे लागत आहे. दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदाराला अद्यापही हे काम पूर्ण करणे का जमले नाही? ठेकेदाराला योग्य वेळेत काम करणे शक्य नव्हते, तर कक्ष बंद का करण्यात आला? रुग्णालयीन इमारतींमधील व त्यातही रुग्ण अॅडमिट असतात, अशा कक्षाची दुरुस्ती योग्य वेळेत पूर्ण व्हायला हवी की नको? असे प्रश्न नागरिकांकडून विचारले जात आहेत.
*… तर रुग्णांची गैरसोय होणार*
अवघ्या दोन-चार दिवसांतच सुरू होण्याची शक्यता आहे. पावसात मोठ्या प्रमाणात, विशेषतः तापसरीचे रुग्ण रुग्णालयात दाखल होत असतात. जिल्ह्यातील हे मध्यवर्ती शासकीय रुग्णालय असल्याने पावसाळ्यात, तर येथील रुग्णसंख्या खूपच वाढते. अशा स्थितीत पुरुष कक्ष बंद राहिल्यास रुग्णांची मोठी गैरसोय होणार आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने याबाबत तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!