कोकणमहाराष्ट्रसामाजिक

तेरवण आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

*🛑तेरवण आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴साटेली-भेडशी, दि-०३*:-सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान व दोडामार्ग तालुक्यातील तेरवण ग्रामस्थ मंडळातर्फे तेरवण येथे रविवारी आयोजित निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ‘सिंधुमित्र’च्या या वैद्यकीय सेवाभावामुळे तेरवणवासीय भारावून गेले. चंदगड व दोडामार्ग तालुक्याच्या सीमेवर अतिदुर्गमस्थानी असलेल्या तेरवण गावात हे पहिलेच आरोग्य शिबीर झाले. या शिबिराचा १३० जणांनी लाभ घेतला.तेरवणचे ग्रामदैवत सातेरी-भावई मंदिरच्या सभामंडपात झालेल्या शिबिराचे उद्घाटन सावंतवाडीच्या जीवनरक्षा हॉस्पिटलचे डॉ. शंकर सावंत यांच्या हस्ते झाले. सिंधुमित्र प्रतिष्ठानचे डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, मधुमेह व हृदयरोग तज्ज्ञ डॉ. नंददीप चोडणकर, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. स्वाती पाटील, स्त्री रोग प्रसुती तज्ज्ञ डॉ. अंकिता मसुरकर, डॉ. सौ. मुग्धा ठाकरे, डॉ. राहुल गव्हाणकर, डॉ. चेतन परब, सामाजिक कार्यकर्ते विजय गवस, मानकरी जयराज गवस, माजी सैनिक सोमा गवस, सदाशिव गवस, तुकाराम गवस, नागेश नाईक, संतोष गवस, दत्ताराम गवस, राजाराम गवस, मिरवेल सरपंच संतोष पवार, माजी सरपंच विद्याधर बाणे, नामदेव गवस, शंकर कृष्णा गवस, रोहन सावंत, ओमकार गवस, अपर्णा गवस, गोपाळ गवस आदी उपस्थित होते. शिबिरात शल्य चिकित्सक डॉ.शंकर सावंत, मधुमेह व हृदयरोग तज्ज्ञ डॉ. नंददीप चोडणकर, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. स्वाती पाटील, स्त्रीरोग प्रसुती तज्ज्ञ डॉ. अंकिता मसुरकर, डॉ. सौ. मुग्धा ठाकरे, डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, डॉ. राहुल गव्हाणकर, डॉ. चेतन परब यांनी रुग्णांची तपासणी केली. रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली. दुर्गम गावात निःशुल्क निदान व चिकित्सा सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल तेरवण ग्रामस्थांनी सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या या आरोग्य सेवेच्या उपक्रमाचे कौतुक करीत सिंधुमित्र प्रतिष्ठानचे आभार मानले. शिबिराचे नियोजन सिंधुमित्र प्रतिष्ठानचे कार्यकर्ते अँड्र्यू फर्नांडिस, आनंद साधले, भगवान रेडकर, दीपक गावकर, सिद्धेश मणेरीकर यांनी केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!