हॅण्डब्रेक न लावल्याने कंटेनर घुसला आरटीओ कार्यालयात
*🛑हॅण्डब्रेक न लावल्याने कंटेनर घुसला आरटीओ कार्यालयात*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴बांदा, दि-०३*:-कागदपत्रांच्या तपासणीसाठी उभा असलेला कंटेनर थेट आरटीओ कार्यालयात घुसल्याची घटना पत्रादेवी (गोवा) येथे घडली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, यात नाक्याच्या चौकीसह दुचाकी व बाजूला असलेल्या मोटारीचे नुकसान झाले. ही घटना रविवारी दुपारी घडली. कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी संबंधित चालक कंटेनर उभा करुन निघून गेला. मात्र, तत्पूर्वी त्याने हॅण्डब्रेक लावला नसल्यामुळे हा अपघात घडला, असे तेथील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.रविवारी दुपारी हरियाणा येथील कंटेनर (एचआर ६९ सी ०६९९) तपासणीसाठी चालकाने पत्रादेवी – गोवा येथील आरटीओ तपासणी नाक्यासमोर उभा केला होता. चालक कंटेनरची कागदपत्रे घेऊन चौकीतील कार्यालयात गेला होता. मात्र, चालक हॅण्डब्रेक ओढण्यास विसरल्याने कंटेनर थेट चौकीत शिरला. यावेळी त्याठिकाणी कार्यरत असलेले अधिकारी गावकर व अन्य कर्मचारी यांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतल्याने ते बचावले. मात्र, यामध्ये दुचाकी, कार व चौकीचे नुकसान झाले. याठिकाणी नेहमीच वाहनांची व लोकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. मात्र, सुदैवाने जीवितहानी टळली. यापूर्वी देखील येथील तपासणी नाक्यावर अनेक अपघात झाले आहेत. काही वर्षांपूर्वी अबकारी। खात्याच्या नाक्यावर कंटेनर कोसळल्याने दोन कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला होता.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

