कुडाळकोकणमहाराष्ट्रशासकीय

‘कुडाळ भूमिअभिलेख ‘मध्ये अनागोंदी कारभार !

*🛑’कुडाळ भूमिअभिलेख ‘मध्ये अनागोंदी कारभार !*

*🛑नागरिकाने वेधले जिल्हा अधीक्षकांचे लक्ष*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴ओरोस, दि-०१*:-कुडाळ येथील भूमिअभिलेख कार्यालयात अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप कुडाळ तालुक्यातील सरंबळ येथील सीताराम कदम यांनी केला आहे. त्यांना झालेल्या त्रासाबद्दल त्यांनी जिल्हा अधीक्षक यांचे लक्ष वेधले असून कारभार सुधारावा, गोरगरीब जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, कुडाळ येथे जमीन मोजणी अर्ज सादर करण्याकरिता गेल्यास अर्ज सादर होत नाहीत. • नकाशासाठी अर्ज दिल्यावर त्याची पोहोच मिळत नाही, असे त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले असून अर्जाची पोहोच देणे अनिवार्य करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.नकाशा मागणी अर्जच गहाळ होतात व पोहोच नसल्यामुळे परत नवा अर्ज देऊन मागणी करावी लागते. असे वारंवार घडत आहे. हे समर्थनीय नाही. अशा कारभारामुळे कार्यालयात येणाऱ्या गरीब शेतकऱ्यांना आर्थिक खर्चाचे व मानसिक त्रासाचे होत आहे. याकडे आपण जातीनिशी लक्ष घालून जनतेची होणारी अडवणूक व जनतेला बसणारा भुर्दंड याचा विचार करून योग्य ती दप्तर व्यवस्था सुधारण्याची कार्यवाही तातडीने करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सर्वसामान्यांना अर्ज दिल्यावर विहित मुदतीत नक्कल मिळण्याची अपेक्षा असते. अर्ज प्राप्तीच्या क्रमवारीनुसारच त्या-त्या तारीखला कागदपत्र उपलबध होतील, अशी व्यवस्था अवलंबिण्यात यावी. धनदांडग्या लोकांचे कागदपत्र तातडीने प्राप्त होतात आणि गरीब शेतकरी बाहेर गावातून येणार असतात. त्यांना त्यांचे कागदपत्र वेळेत उपलब्ध होत नाहीत, ही नित्याची बाब असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!