🛑 पडवे माजगाव येथे इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये बेकायदा अनधिकृत मायनिंग उतखनन करण्याच्या नावाखाली बेसुमार वृक्षतोड..
🛑 सर्व्हे करून दोषीवर कडक कारवाई करावी ; माजी आमदार परशुराम उपरकर यांची उपवनसंरक्षक नवाकिशोर रेड्डी यांच्याकडे मागणी
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-३०:–
सावंतवाडी तालुक्यातील पडवे माजगाव येथे बेकायदा अनधिकृत मायनिंग उतखनन करताना इको सेन्सिटिव्ह झोन मधील हजारो झाडे तोडण्यात आली आहेत तसेच कणकवली तालुक्यातील वरवडे पिसेकामते या इको सेन्सिटिव्ह भागात सुद्धा रस्ता काम करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्ष तोड झाली असून त्यांचा सर्व्हे करून दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी मंगळवारी वनविभागाचे उपवंनसंरक्षक नवाकिशोर रेड्डी यांच्याकडे माजी आमदार परशुराम ऊर्फ जीजी उपरकर यांनी केली.
माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मंगळवारी सावंतवाडी येथे वनवीभागाचे उपवनसंरक्षक नवाकिशोर रेड्डी यांची भेट घेतली. यावेळी यावेळी सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार, मंदार नाईक, विजय जांभळे, प्रवीण गवस, नंदू परब, मनोज कांबळी, संदेश सावंत, स्वप्निल जाधव, गिर्गोल दिया व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी उपरकर यांनी सावंतवाडी तालुक्यातील पडवे माजगाव येथील इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये बड्या अधीकाऱ्यांच्या आशिर्वादामुळे बेकायदा मायनिंग उत्खनन झाले आहे. त्यावेळी या क्षेत्रातील हजारो झाडे तोडण्यात आली आहेत. याबाबत गुगल मॅप वरून वृक्ष तोड झाल्याचे स्पष्ट दिसत आहे त्यामुळे दोषीवर कडक करावाई केली जावी. कणकवली वरवडे पिसेकामते येथे देखील इको सेन्सिटिव्ह क्षेत्रात रस्त्याच्या कामावेळी मोठ्या प्रमाणावर वृक्ष तोड झाली आहे. मात्र वनपाल भीरवंडे यांनी पंचनामे करताना कमी झाडांची नोंद दाखवली आहे. शिवाय जी झाडे जप्त केलीत त्यांना सील देखील मारलेले नाही याबाबतची वस्तूस्थिती देखील गुगल मॅप वरून उपरकर यांनी उपवनसंरक्षक रेड्डी यांच्या निदर्शनास आणून दिली यातील दोषीवर देखील कारवाई केली जावी अशी मागणी जीजी उपरकर यांनी केली. त्याचप्रमाणे गवा रेडे, हत्ती वन्यप्राणी यांच्याबाबत उपाययोजना करण्यासाठी केंद्राने 35 लाख रुपयांचा निधी खर्च केला मात्र कोणत्याही ठोस उपायोजना झाल्या नाहीत उलट वन्य प्राणी मानवी वस्तीकडे येत आहेत. असे उपरकर यांनी सांगत राज्य शासनाने वन्य प्राणी यांच्या बंदोबस्त साठी कोट्यावधी रुपये दिले त्याचा खर्चाचा तपाशील उपलब्ध नसून तो वनवीभागाने द्यावा अशी मागणी केली. सावंतवाडी तालुक्यात गोवा कर्नाटक राज्यातील शिकारी स्थानीक जंगला मध्ये येऊन शिकार करतं आहेत त्यांच्यावर कोणतेही कारवाई होत नाही याबाबत एक महिन्याच्यां आत योग्य ती कारवाई करावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा माजी आमदार जिजी उपरकर व उपस्थितांनी दिला.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

