सावंतवाडी शहरात वाहतूक कोंडी बनली नित्याची
*🛑सावंतवाडी शहरात वाहतूक कोंडी बनली नित्याची*
*🛑वाहन चालकांसह पादचाऱ्यांना द्यावे लागते अनेक समस्यांना तोंड : प्रशासनाचे एकमेकांवर बोट*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२९*:-सावंतवाडी शहरात वाहन पार्किंगची जटील समस्येमुळे वाहतूक कोंडी नित्याची ठरली आहे. असे असताना शहरात गर्दीच्यावेळी वाहतूक पोलीस तैनात नसल्याने वाहन चालकांसह पादचाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.वाहन पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत पालिका प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे गर्दीच्यावेळी शहरात खरेदीसाठी येणाऱ्या पर्यटकांची वाहने नगरपालिकासमोरील मोती तलावाच्या काठाच्या दोन्ही बाजूंनी पार्किंग करण्यात येतात. त्यामुळे आरपीडी हायस्कूलपर्यंतच्या मार्गावर वाहतूक कोंडी नित्याची ठरली आहे. या मार्गावर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस विभागाकडून वाहतूक पोलीस कर्मचारी कार्यरत ठेवणे गरजेचे आहे. या मार्गाच्या दोन्ही बाजूंनी दुचाकीसह चारचाकी वाहने बिनधास्तपणे पार्किंग केल्या जातात. याच मार्गावर नगरपालिका इमारतीसमोर एसटी बसस्टॉप असल्याने प्रवाशांची गर्दी असते. बस स्टॉपच्या ठिकाणीही वाहने पार्किंग केलेली असतात. गर्दीत व वाहतूक कोंडीत प्रवासी बसमध्ये जाण्याचा प्रयत्न करताना अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चार वर्षापूर्वी बसस्टॉपच्या ठिकाणी बसमध्ये प्रवास करण्यासाठी जाणाऱ्या वृद्ध महिलेचा बसच्या चाकाखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर नगरपालिका प्रशासन पोलीस यंत्रणेने अपघाताची दखल घेत वाहन पार्किंग व वाहतूक पोलिसांची नेमणुका केल्याने वाहतूक सुरळीत झाली होती. सध्या उन्हाळी सुट्टीतील गर्दी हंगामामुळे पर्यटकांची शहरात गर्दी वाढत आहे. नगरपालिका प्रशासनाकडून पार्किंगची कोणतीही व्यवस्था केली नाही. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून मोती तलावाच्या काठाच्या एका बाजूने पार्किंग व्यवस्था केली. ही जागा अपुरी पडत असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहने पार्किंग गेल्या जात आहेत. त्यातच नगरपालिकेच्या नवीन भाजी मार्केट इमारतीचे कामामुळे त्याठिकाणी असलेल्या सहा सिटर रिक्षा स्टॅण्ड चालकांना तलावाच्या एका बाजूने पर्यायी जागा उपलब्ध करून दिली. गर्दीच्या हंगामात शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत नगरपालिका प्रशासन व पोलीस यंत्रणेने नियोजन बैठक घेऊन पर्यायी तोडगा काढला पाहिजे होता. परंतु, दोन्ही विभागाकडून कोणतीही दखल घेतली दिसत नाही. त्याचा परिणाम पर्यटक व पादचाऱ्यांना सोसावा लागत आहे. दोन्ही प्रशासन एकमेकांवर बोट दाखवितात. पोलीस यंत्रणेकडून वाहतूक पोलीस कार्यरत ठेवल्यास व नगरपालिका प्रशासनाने पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून दिल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. नगरपालिका प्रशासनाने नगरपालिका इमारतीसमोर वाहतूक पोलिसांना कायमस्वरुपी ट्राफिक बुध उभारून दिल्यास उन्हाळा, पावसाळा कालावधीत वाहतूक पोलीस सुरक्षित ड्युटी बजावत वाहतूक कोंडीवर नजर ठेऊ शकतात.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

