वेत्येत कैलास ढाब्याच्या पाठिमागे आढळली मानवी हाडे सावंतवाडी –
वेत्येत कैलास ढाब्याच्या पाठिमागे आढळली मानवी हाडे
सावंतवाडी –
वेत्ये कैलास धाब्याच्या पाठीमागे मानवी हाड कवटी सहित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे
पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सदरची हाडे ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी पाठवणार आहेत.
याबाबतची मिळालेली माहिती अशी की वेत्ये रोडवर असलेल्या कैलास धाब्याच्या पाठीमागे आज संध्याकाळी मानवी हाडे असल्याचे दिसली, त्यांनी संबंधित धाबे मालकाला याची कल्पना दिली त्यानंतर वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी घटनास्थळी येत पाहणी करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले व सदरची हाडे पंचनामा करून ताब्यात घेतली अधिक तपास सुरू आहे.

