*आजगाव मराठी शाळा माजी विद्यार्थी संघाच्या वतीने कु.सानिका मोरजकर हीचा सत्कार* :- बारावीच्या परीक्षेत घेतले होते ९०.६७% गुण
*आजगाव मराठी शाळा माजी विद्यार्थी संघाच्या वतीने कु.सानिका मोरजकर हीचा सत्कार* :- बारावीच्या परीक्षेत घेतले होते ९०.६७% गुण
बा.म. गोगटे महाविद्यालय शिरोड्याची सानिका मोरजकर ठरली शिरोडा केंद्रात प्रथम तर वेंगुर्ला तालुक्यात द्वितीय, तिच्या या उज्वल यशाबद्दल आजगाव मराठी शाळा माजी विद्यार्थी संघामार्फत सानिकाचा सत्कार करण्यात आला.
नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात बा़.म. गोगटे महाविद्यालय शिरोड्याची कुमारी सानिका जितेंद्र मोरजकर हीने( ९०.६७ %) टक्के गुण मिळवत वेंगुर्ला तालुक्यात द्वितीय क्रमांक तर शिरोडा महाविद्यालयात प्रथम येत उज्वल यश संपादन केल्याबद्दल आजगाव मराठी शाळा माजी विद्यार्थी संघामार्फत तिचे कौतुक करून सत्कार करण्यात आला. आजगाव ग्रंथालयामध्ये आजगाव मराठी शाळा माजी विद्यार्थी संघामार्फत आयोजित कार्यक्रमात यावेळी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मा.रामचंद्र उर्फ अण्णा झाट्ये, सचिव विलासानंद मठकर, उपाध्यक्ष सूर्यकांत आडारकर, माजी केंद्रप्रमुख विनायक उमर्ये, माजी सरपंच सुवर्णा झाट्ये, सुनील वाडकर, आजगाव वाचनालयाच्या ग्रंथपाल प्रिया आजगावकर, सानिकाचे वडील जितेंद्र मोरजकर, तसेच गावातील शिक्षणप्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते.
सानिकाचे प्राथमिक शिक्षण आजगाव येथील प्राथमिक शाळेत तर पुढील आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण आजगाव विद्याविहार इंग्लिश स्कूल येथे झाले. सामान्य कुटुंबातील सानिका शिक्षणाच्या मोठ्या सोयी सुविधा नसताना सुद्धा तिने हे उत्तुंग यश प्राप्त केलं त्याबद्दल तिचं संपूर्ण गावातून कौतुक होत आहे. ग्रामीण भागात राहून सुद्धा जिद्द, चिकाटी आणि प्रचंड मेहनत करुन तिने मिळविलेले यश गावातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे असे मत याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष रामचंद्र उर्फ अण्णां झाट्ये, सचिव विलासनंद मठकर उपाध्यक्ष सूर्यकांत आडारकर, विनायक उमर्ये यांनी सानिकाच्या यशाबद्दल तिचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

