कुडाळकोकणक्राइममहाराष्ट्र

पिंगुळीतील तरुणाची गळफास लावून आत्महत्या

*🛑पिंगुळीतील तरुणाची गळफास लावून आत्महत्या*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-२५*:-पिंगुळी-शेटकरवाडी येथील नीलेश मंगेश मोर्ये (४५) यांनी गुरुवारी सायंकाळी आपल्या आंबाबागेत आंबा कलमाला गळफास लावून आत्महत्या केली. नीलेश गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून घरापासून दीड ते दोन किमी अंतरावर असणाऱ्या खोडदेश्वर या ठिकाणी मोटारसायकल घेऊन गेले होते. त्यांच्या हातात दोरी होती. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांनी झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. काहीवेळाने त्यांच्या शोधासाठी त्यांची पत्नी व घरातील माणसे गेली असता नीलेशचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत आढळला. ही घटना आजूबाजूला समजताच ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली. याबाबत पोलिसांत खबर दिल्यानंतर रात्री पंचनामा करून उशीर झाल्याने मृतदेह ओरोस येथील शवागृहात ठेवण्यात आला.शुक्रवारी सकाळी विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. नीलेश सुतारकाम करायचे. त्यांना क्रिकेटची आवड होती. ते चांगले क्रिकेटपटू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, वडील, भाऊ, वहिनी, पुतणे व अन्य असा परिवार आहे. अंगणवाडी सेविका स्वाती पालकर-मोर्ये यांचे ते पती, रिक्षा व्यावसायिक संजय मोर्ये यांचे बंधू तर पिंगुळीच्या माजी सरपंच निर्मला पालकर-मोर्ये यांचे दिर होत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!