तळगाव येथे नदीत बुडून वृद्धाचा मृत्यू
*🛑तळगाव येथे नदीत बुडून वृद्धाचा मृत्यू*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-२५*:-मालवण तालुक्यातील तळगाव येथील कर्ली नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दत्ताराम शंकर दळवी (७८, रा. तळगाव खांदवाडी) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ९.३० च्या सुमारास घडली. याबाबत मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळगाव खांदवाडी येथील दत्तात्रय दळवी हे तळगाव व मुंबई येथे येऊन-जाऊन राहत असायचे. सध्या मे महिन्यात उन्हाळी सुट्टी कालावधीत ते आपल्या कुटुंबियांसमवेत तळगाव येथे आले होते. ते नेहमी कर्ली नदीत पोहायला जायचे. आज सकाळीही ते नदीत पोहण्यासाठी उतरले असता, पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे त्यांचा पुतण्या मारुती दळवी यांना दिसल्यावर त्यांनी तात्काळ ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह नदीबाहेर काढला. याबाबत मालवण पोलिसांत खबर देण्यात आली असून आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलीस हवालदार प्रकाश मोरे व पोलीस कॉस्टेबल सिद्धेश चिपकर हे तपास करत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

