आपत्कालीनकुडाळमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

कुडाळ शहरातील वामन पाटणकर यांच्या गोडाऊनला आग

 

कुडाळ शहरातील वामन पाटणकर यांच्या गोडाऊनला आग

कुडाळ : कुडाळ शहरातील ओटवणेकर तिठा येथील वामन शंकर पाटणकर यांच्या कापड दुकानातील गोडाऊनला आज शुक्रवारी सायंकाळी पाच सव्वापाचच्या सुमारास आग लागल्याने परिसरातील व्यापाऱ्यांची धावपळ उडाली. बाजारपेठेत हे कापड दुकान आहे. परिसरात काही दुकाने आहेत पाटणकर यांच्या कापड दुकानाचे गोडाऊन तिसऱ्या मजल्यावर आहे खालच्या मजल्यावर कापड दुकान आहे. तिसऱ्या मजल्यावर असलेल्या गोडाऊनला अचानक आग लागली. धुराचे लोट आतून बाहेर पडू लागले तेव्हा परिसरातील व्यापारी व्यवसायिकांनी ही आज बघितल्यावर आग विझवण्यासाठी धावपळ केली.

अग्निशामक दलाला पाचारण केले तोपर्यंत आग गोडाऊन मध्ये पसरली. बाहेर आगीचे धुराचे लोट पसरू लागले. कुडाळ एमआयडीसीची अग्निशामक गाडी तात्काळ घटनास्थळी आली आणि आग विजवण्यास सुरुवात केली.. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. वेळीच आग विझवण्यात आल्याने आसपासचीघरेदुकानने बचावली. त्यातच पावसाळी ढगाळ वातावरण असल्यामुळे आग मोठी पसरली नाही मोठा आला तर त्याला यात लाखो रुपयांची नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!