देवगड तुळशीकाटे येथील बागेला आग, दोन लाखाचे नुकसान
*🛑देवगड तुळशीकाटे येथील बागेला आग, दोन लाखाचे नुकसान*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴देवगड, दि-२४*:-देवगड-तुळशीकाटे येथील तुषार तुकाराम भाबल यांच्या कलम बागेला बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमध्ये २० मोठी हापूस आंबा कलमे होरपळली आहेत. यात भाबल यांचे सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले. स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ राबविलेल्या मदतकार्यामुळे आग नियंत्रणात आली. अन्यथा नजीकच्या अन्य बागांनाही या आगीची झळ पोहोचून मोठे नुकसान झाले असते. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, देवगड- तुळशीकाटा येथील तुषार भाबल यांच्या मालकीच्या कलमबागेत ६० कलमे होती. या बागेत दुपारी आग लागल्याचे नजीकच्या बागेतील नागरिकांनी लक्षात येताच त्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. घटनेची माहिती मिळताच तुषार भाबल हेदेखील बागेकडे आले. किशोर कणेरकर, नरेश मेस्त्री आदी ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. काही वेळानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. अन्यथा अन्य बागांनाही आगीची झळ बसून नुकसान झाले असते. या घटनेत भाबल यांच्या बागेतील २० कलमे आगीत पूर्णतः होरपळली आहेत. जामसंडे तलाठी संतोष डांगे, कृषी सहाय्यक एच. एच. सलगरकर यांनी नुकसानीचा पंचनामा केला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

