कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

सावंतवाडी पोलीस वसाहत मार्गावरील झाडे धोकादायक

*🛑सावंतवाडी पोलीस वसाहत मार्गावरील झाडे धोकादायक*

*🛑पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे कोसळण्याची भीती*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२१*:-सावंतवाडी पोलीस वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जुनाट झाडे वादळी पावसात कोसळण्याची भिती निर्माण झाली आहे. याच मार्गावर विद्युत लाईन असल्याने झाडे कोसळल्यास वीजपुरवठा खंडित होऊन वीज कंपनीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात जुनाट झाडांच्या फांद्या तुटून वीज वाहिनीवर पडून जाणाऱ्या वसाहतीतून शाळकरी मुलांसह तिघेजण जखमी झाले होते. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली होती. दुचाकींचेही नुकसान झाले होते. त्यावेळी पोलीस वसाहतीमधील वीजपुरवठा दोन दिवस बंद राहिल्याने वसाहत अंधारात होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने काही झाडांच्या फांद्या तोडल्या होत्या.अद्यापही या वसाहतीमधील रस्त्यावर अनेक वर्षे झालेली जुनी भली मोठी झाडे आहेत. झाडांच्या बाजूला पोलीस कर्मचाऱ्यांची घरे आहेत. झाडांच्या फांद्या घरांच्या छपरावरील सिमेंट पत्र्यांवर पडून नुकसान होत आहे. जुनी झाडे धोकादायक स्थितीत असून वादळी पावसात कोसळून अगर फांद्या तुटून मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस ठाण्याच्या गेटसमोर असलेली चार मोठी जुनी झाडे धोकादायक स्थितीत आहेत. त्या झाडांच्या आवारात रस्त्यालगत अनेकजण आपली दुचाकी व चारचाकी वाहने पार्कीग करतात. अशा वेळी झाड कोसळल्यास नुकसान होऊ शकते. या बाबत धोकादायक झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी पोलीस ठाण्याकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावाही करण्यात आला होता. मात्र, गेली दोन वर्षे पोलीस वसाहतीच्या समस्यांकडे लक्ष देण्यात आलेले नाही. त्यामुळे पोलीस वसाहतीमधील पोलीस कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय पावसाळ्यात जीव मुठीत धरून राहत आहेत. पोलीस अधीक्षक यांनी वसाहतीची पाहणी करून बांधकाम विभागाला सूचना करावी. बांधकाम विभागानेही सर्व्हे करून पावसाळा सुरू होण्यापूर्वी धोकादायक झाडांच्या फांद्या तोडून होणारी नुकसानी टाळावी, अशी मागणी होत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!