आणखीआपत्कालीनकोकण

माठेवाडा येथील रहिवासी श्रीम. अंशुमती रामचंद्र मोरजकर यांचं निधन

सावंतवाडी : शहरातील माठेवाडा येथील रहिवासी श्रीम. अंशुमती रामचंद्र मोरजकर यांचं शनिवारी रात्री निधन झालं. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्ते कै. रामचंद्र मोरजकर यांच्या त्या पत्नी होत. माठेवाडा येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात एक मुलगी, जावई, दोन नातू, नातसुना, पणतू असा मोठा परिवार आहे. सावंतवाडी तालुका भंडारी समाज मंडळाच्या संचालिका सौ. समता सुर्याजी यांच्या त्या मातोश्री तर सामाजिक कार्यकर्ते देव्या सुर्याजी यांच्या आजी होत. रात्री उशीरा उपरलकर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!