कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

मोती तलावातील गाळ काढण्याचे काम अर्धवटच

*🛑मोती तलावातील गाळ काढण्याचे काम अर्धवटच*

*🛑दोन वर्षांपूर्वी गाळ काढताना कोसळलेली संतक्षक भिंत*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१७*:-येथील मोती तलावातील गाळ -२०२२ मध्ये पालिकेने काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, उपजिल्हा रुग्णालयाच्या बाजूची संरक्षक भिंत गाळ काढण्यासाठी लावण्यात आलेल्या डोजरमुळे कोसळली. त्यामुळे गाळ काढण्याचे काम थांबवून शिवरामराजे पुतळा येथे गाळ काढण्यास प्रारंभ झाला. परंतु पावसामुळे हे काम थांबविण्यात आले. गाळ काढण्याचे काम पालिकेने अर्धवट ठेवले. मात्र, गाळ काढताना जी संरक्षक भिंत कोसळली, ती पुन्हा बांधण्यासाठी एक कोटी तेरा लाख रुपये खर्च केलेत. पालिकेने तलावातील गाळ काढला नाही. तलावात वाढलेल्या जलपर्णी काढण्यासाठी न.पा. कर्मचाऱ्यांना दोन महिने मेहनत घ्यावी लागली. परंतु जलपर्णीचे सावट अद्याप आहे. मोती तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. तो काढण्याची मागणी होत होती. त्यामुळे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी २०२२ मध्ये राजघराण्याच्या सहमतीने मोती तलावातील गाळ काढण्याचे ठरविले. लोकसहभागातून हा गाळ काढण्यात येणार होता परंतु नंतर जलसंपदा विभागाच्या डोजरने हा गाळ काढण्याचे ठरले. जलसंपदा ‘विभागाने संरक्षक भिंत कोसळणार असल्याची सूचना केली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि तलावातील गाळ काढण्यात आला. हा गाळ जलसंपदा विभागाच्या डोजरने काढण्यात आला. परंतु उपजिल्हा रुग्णालयाच्या बाजूने असलेल्या संरक्षक. भिंती डोजरच्या कंपनाने कोसळल्या. त्यामुळे गाळ काढण्याचे काम थांबविण्यात आले. मात्र, संरक्षक भिंत कोसळल्मार्ग सावंतवाडी-बांदा मार्ग धोकादायक बनला. त्यामुळे पुन्हा नागरिकांतून संरक्षक भिंत बांधण्याची मागणी होऊ लागली. सार्वजनिक बांधकाम विभागालाही यासंदर्भात धारेवर धरण्यात आले.संरक्षक भिंत बांधण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे हाती घेण्यात आले. त्यासाठी एक कोटी १३ लाख रु. खर्च करण्यात आले. गाळ काढण्याचे काम जैसे थे राहिले. तलावातील गाळ काढणे आवश्यक होते. आता गाळ न काढल्यामुळे तलावात जलपर्णी वाढत आहेत. यापूर्वी वाढलेल्या जलपर्णी काढण्यात आल्या परंतु त्या पुन्हा- पुन्हा डोके वर काढत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!