कोकणक्राइममहाराष्ट्रमालवण

पोईप विदर्भ कोकण बँकेत शॉर्टसर्किटने आग

*🛑पोईप विदर्भ कोकण बँकेत शॉर्टसर्किटने आग*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴बागायत, दि-१७*:-विदर्भ कोकण ग्रामीण बैंक पोईप शाखेमध्ये गुरुवारी पहाटे शॉर्टसर्किटने आग लागली. या आगीत बँकेतील कागदपत्रे व इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले. बँकेचे कर्मचारी श्यामसुंदर अंकुश मालवणकर हे आज सकाळी बँक शाखा उघडण्यासाठी दहा वाजता पोईप येथे आले असता, हा प्रकार निदर्शनास आला.पोईप ग्रामपंचायतीच्या मालकीच्या इमारतीतील तळमजल्यावर गेली अनेक वर्षे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेची शाखा सुरू आहे. बँकेचे कर्मचारी श्रीरामसुंदर मालोंडकर हे नेहमीप्रमाणे बुधवारी सायंकाळी बँक शाखा बंद करून घरी गेल्यावर रात्री ते गुरुवारी पहाटेच्या सुमारास शॉर्टसर्किटने बँकेच्या शाखेत आग लागली. ही इमारत स्लॅबची असल्यामुळे व पूर्ण सुरक्षित व बंदिस्त असल्याने आतील आगीची कल्पना . बाहेर समजू शकली नाही. सकाळी दहा वाजता मालोंडकर हे बैंक उघडण्यासाठी आले असता, दरवाजा उघडल्यावर त्यांना आतमध्ये धुराचा लोट दिसला व काही साहित्य जळत असलेले दिसले. यावेळी मालोंडकर यांनी पोईप बाजारपेठ येथील ग्रामस्थांना आगीची माहिती दिल्यावर सामाजिक कार्यकर्ते गोपीनाथ पालव, सुनील पालव, नितीन पालव, बबलू वेंगुर्लेकर, गणेश माने, समीर पालव व इतरांनी बाजूच्या घरातून पाणी आणून आग आटोक्यात आणली. मात्र, बँकेतील घड्याळ पावणेतीन वाजता बंद पडल्याने ही आग रात्री दोन नंतर लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.या आगीत बँकेचा काउंटर, रोखापाल केबिन, बँकेचे संपूर्ण फिटिंग, तीन फॅन, आठ ट्युबलाईट्स, घड्याळ, प्रिंटर्स, बँकेतील कागदपत्रे, खुर्ची तसेच सीसीटीव्ही यंत्रणाही बंद पडली. यामुळे बँकेचे कामकाज व आर्थिक व्यवहार गुरुवारपासून पुढील दुरुस्ती होईपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. यावेळी बँकेतील आगीचा पंचनामा करण्यात आला. यावेळी बँक शाखाधिकारी लक्ष्मी पांडुरंग पडते, ग्रामसेवक सी. पी. सडविलकर, तलाठी डी. सी. ठाकुर, सरपंच श्रीधर नाईक, पोलीस पाटील महेश परब, मसुरे बीट अंमलदार प्रमोद नाईक, श्रीरामसुंदर मालवणकर, रंजन मालवणकर, पी. जी. हिंदळेकर, ग्रामस्थ समीर माधव उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!