आणखी

माजी नगरसेवकाचे पाण्यासाठी आंदोलन ;५० फूट उंच टाकीवर चढत छेडले आंदोलन

सावंतवाडी समाजमंदिर पाठीमागे असलेल्या सुमारे पन्नास फूट उंचीच्या टाकीत पाणीच नसल्याने माजी नगरसेवक विलास जाधव सुमारे पन्नास फूट उंच असलेल्या टाकीवर चढून आंदोलन छेडले आहे,जो पर्यंत ही टाकी पूर्ण क्षमतेने भरत नाही तो पर्यत खाली उतणार नाही असा पवित्रा जाधव यांनी घेतला आहे.

सावंतवाडी समाज मंदिर पाठीमागे समाज मंदिर व गरड परिसराला पाणी पुरवठा करणारी टाकी आहे,ही टाकी पाण्यानें भरत नसल्याने परिसरातील नागरिकांची पाण्या अभावी हाल होत आहे, नागरीकांच्या तक्रारीने त्रस्त झालेले माजी नगरसेवक विलास जाधव यांनी आज समाज मंदिर गाठत सुमारे पन्नास ते साठ फुट उंचिवर असलेल्या टाकीवर चढले आहेत,एक लीटरच्या टाकीत एक हजार लिटर सुध्दा पाणी नसल्याने हे हाल होत असल्याचे जाधव यांचे म्हणणे आहे,जो पर्यत ही एक लाख लिटरची टाकी भरत नाही तो पर्यंत खाली उतरणार नाही ,माझ्या जिवाचे काही बरे वाईट झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहिलं असा इशारा माजी नगरसेवक विलास जाधव यांनी दिला..विलास जाधव हे एक पायाने अधू आहेत,एका अपघातात त्यांच्या पायाला अपघात झाला होता,व ते मधुमेहाचे रुग्ण आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!