सामाजिक

सिंधुदुर्ग सैनिक स्कूल प्रवेश सुरु

सावंतवाडी,दि.१६: महाराष्ट्रात नामवंत शाळा म्हणून उल्लेख असलेल्या आंबोली येथील सैनिक स्कूल मध्ये ६ वी व ११ वीच्या विज्ञान शाखेच्या चालू वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना करीयर मार्गदर्शना बरोबर सैन्यदल प्रवेश परिक्षा, एन.डी.ए, जे.ई.ई, एन.ई.ई.टी, एम.एम.टी, सी.ई.टी आदी परीक्षांबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

 

सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स सर्विस मॅन असोशिएशन यांच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या या शाळेत आदर्श गुरूकुल पध्दतीने निवासी सैनिकी शिक्षण दिले जाते. संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या मुलांना सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष आणि ग्रंथालय देण्यात आले आहे. तसेच मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी उच्चशिक्षीत अनुभवी शिक्षण आणि प्रशिक्षक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यामुळेत या शाळेत प्रवेश घेवू इच्छीणाऱ्या विद्यार्थी तसेच पालकांनी संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यानआले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!