देवगड न. पं. नजीकचा कचरा हटविण्याचे काम सुरू
*🛑देवगड न. पं. नजीकचा कचरा हटविण्याचे काम सुरू*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴देवगड, दि-१६*:-कार्यालयानजीकच देवगड-जामसंडे नगरपंचायतीने तात्पुरत्या स्वरुपात तयार केलेल्या कचरा डेपोतील कचरा तेथून हटविण्यास सुरुवात केली आहे. याप्रश्नी भाजपचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांना घेराव घालून जाब विचारला होता. यावेळी न. पं. प्रशासनाच्यावतीने मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी दोन दिवसांत कचरा तेथून हटविण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार हा कचरा जेसीबी, डंपरच्या सहाय्याने तेथून हटविण्यात येत असून जनतेमधून समाधान व्यक्त होत आहे. देवगड-जामसंडे न प्रशासनाच्यावतीने न पं. कार्यालयानजीकच तात्पुरत्या स्वरुपाचा कचरा डेपो तयार करण्यात आला होता. देवगड, जामसंडे न. पं. हद्दीतून गोळा करण्यात येणारा ओला व सुका कचरा तेथे साठविला जात होता. हा प्रकार सुमारे एक महिन्याहून अधिक दिवस सुरू होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा साचून त्यातून परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले होते. न. पं.कार्यालयानजीक रास्त दराचे धान्य दुकान आहे. तेथेही नागरिकांची ये जा सुरू असते. न. पं. कार्यालयातील पं. अधिकारी व कर्मचारी या दुर्गंधीमध्येच काम करीत होते. मात्र, या दुर्गंधीमुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यातच लोकसमा निवडणुकीच्या कामकाजात न पं. प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी अडकले होते. निवडणुकीच्या राजकीय प्रचारात सत्ताधारी व विरोधकही गुंतले होते.मात्र, या कचरा प्रश्नाकडे प्रशासनास लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले होते. अखेर, सोमवारी भाजपचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी न. पं. मध्ये नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांना घेराव घालून जाब विचारला होता. न. पं. मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी दोन दिवसांत तेथून कचरा हटविण्याचे आश्वासन भाजप पदाधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून दिले होते. मात्र, प्रशासनाने दिलेल्या मुदतीत कचरा न हटविल्यास जनआदोलन छेडण्याचा इशारा भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला होता. तत्पूर्वीच प्रशासनाकडून कचरा हटविण्याचे काम सुरू झाले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

